शहरं
Join us  
Trending Stories
1
पूजा दिलीप खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
2
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
3
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
4
Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...
5
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
6
Vidhan Sabha Election: करमाळा-माढा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली; कारण...
7
सध्या मराठा समाज कुणासोबत महाविकास आघाडी की महायुती? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं
8
Life lesson: हो! जीवंतपणी स्वर्ग आणि नरक पाहणे शक्य आहे; 'असा' घ्या अनुभव!
9
“सांगली पॅटर्न लोकप्रिय नाही, मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही अन्यथा...”: संजय राऊत
10
Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेआधी घरातून 'हे' फोटो आधी बाहेर काढा; होऊ शकते आर्थिक नुकसान!
11
प्रेग्नंन्ट आहे दिव्यांका त्रिपाठी, ३९व्या वर्षी होणार आई! दिवाळी पार्टीत फ्लॉन्ट केला बेबी बंप
12
"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला
13
Gold Price Outlook: पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार
14
Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते"
15
दिवाळीतील गुरुवार: इच्छा आहे, पण स्वामी सेवा शक्य होत नाही? ‘अशी’ करा स्वामी समर्थ मानसपूजा
16
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
17
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
18
अखेर तो क्षण आलाच.... तब्बल २८ वर्षांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा जुळून येणार योग
19
Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

संभाजी आरमारने रोखला तासभर रास्ता; कारवाईअंती कार्यकर्त्यांना ताब्यातून सोडले

By काशिनाथ वाघमारे | Published: January 11, 2024 5:40 PM

पोलिसांनी या आंदोलनकांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणून कारवाई केली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले.

काशिनाथ वाघमारे,सोलापूर : केंद्र सरकारने नव्याने मंजूर केलेला अन्यायकारक हिट अँड रन कायदा रद्द करावा या मागणीसाठी संभाजी आरमारच्या वतीने गुरुवारी सकाळी सोलापुरात मार्केट यार्ड चौकात असंख्य वाहन चालकांसमवेत रास्ता रोको आंदोलन करुन लक्ष वेधले. यावेळी जेलरोड पोलिसांनी या आंदोलनकांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणून कारवाई केली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिले.

संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी केंद्रशासनाच्या नव्या मोटार कायद्याचा निषेध नाेंदवत 'जय शिवाजी, जय भवानी'च्या घोषणा दिल्या.

यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, शहरप्रमुख सागर ढगे, शहरउप्रमुख राज जगताप, विभागप्रमुख व्दारकेश बबलादीकर, स्वप्निल ईराबत्ती, गुरूनाथ औंरग, संभाजी आरमार वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील, फैय्याज नगरवाले, शकील शेख, हजरत शेख, सिद्धाराम संगोळगी, संतोष खानापुरे, भास्कर भोसले, बंदेनवाज पठाण उपस्थित होते.वाहन चालक कल्याणकारी मंडळ स्थापा:

यावेळी बोलताना संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी वाहन चालक वर लादलेला जुलमी कायद्या विरोधात संभाजी आरमार ने पुढाकार घेतल्याचे सांगितले. वाहन चालक कल्याणकारी मंडळ सरकारने स्थापन करण्याची आणि वाहन चालक बांधवांच्या लेकरांच्या शिक्षण आरोग्य सुविधा देण्याची मागणी केली. अपघातात जमावा कडून ड्रायवरचा मृत्यू झाल्यास त्याला एक कोटीची मदत त्याच्या कंटुबाला द्यावी अशी मागणी करत हा कायदा रद्द न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय वर मोर्चा काढू म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरStrikeसंप