पंढरपूर : कोरोना काळात पंढरपूरमधील समृद्धी ट्रॅक्टर्सने सोनालिका कंपनीच्या तब्बल ५११ ट्रॅक्टर्सची वर्षभरात विक्रमी विक्री करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक तर देशात तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे.
कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना देखील समृद्धी ट्रॅक्टरचे अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ, शेतकरी सन्मान योजना राबविल्या. ग्राहकांच्या घरी जाऊन सर्व्हिसिंग सेवा, ट्रॅक्टर खरेदीच्या विविध योजना राबवल्या. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सोनालिका ट्रॅक्टर्स उपलब्ध करून दिले आहेत. अभिजीत पाटील यांनी सुयोग्य नियोजन करून शेतकरी बांधवांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहून सेवा करू शकतो, हे दाखवून दिले.(वा. प्र.)
---
कोरोनामुळे शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी आल्या. अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यांची ही अडचण लक्षात घेता जास्तीत जास्त सवलत देण्याचा प्रयत्न केला. हा बहुमान माझा नसून शेतकऱ्यांचा आहे.
- अभिजीत पाटील,
चेअरमन, डीव्हीपी उद्योग समूह, पंढरपूर