आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : अक्कलकोट तालुक्यातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या काही भागातील वाळू तस्कर जिल्हा प्रशासनाला डोईजड झाले आहेत. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या अर्थपूर्ण भूमिकेमुळे प्रशासनावर ही वेळ आली आहे. या ठेकेदारांना वेळीच न रोखल्यास हे प्रकरण जिल्हा प्रशासनाच्या अंगाशी येणार आहे. कल्लकर्जाळ येथे सोमवारी अवैध वाळू उपसा करणाºयांवर कारवाईसाठी गेल्यानंतर तहसीलदार दीपक वजाळे आणि महसूल कर्मचाºयांना वाळू तस्करांनी दमदाटी केली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला माहीत आहेत, परंतु दोन्ही यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून अक्कलकोट तालुक्यातील वाळू ठेकेदारी हा चर्चेचा विषय बनली आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी आळगी-गुड्डेवाडीच्या दरम्यान मध्यरात्री छापा टाकून ४७ गाड्या जप्त केल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमाराला वाळू उपसा करण्यास बंदी असते. पोलिसांनी आणि महसूल यंत्रणेने पंचनामा केला. पंचनाम्यात अनेक गंभीर गोष्टींची नोंद होती. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी ठेकेदाराला दंडही ठोठावला. परंतु, हे प्रकरण दोन टप्प्यात मंत्रालयातून मॅनेज करण्यात आले. त्यामुळे मुंढे यांनी केलेल्या कारवाईला खो बसला. वरिष्ठ स्तरावर पोहोचून मुंढे यांच्यासारख्या अधिकाºयाने घेतलेला निर्णय आपण वळवू शकतो, असा विश्वास ठेकेदारांमध्ये आला. तेथून अक्कलकोट तालुक्यातील वाळू उपशाचे नियम आणि कायदे धाब्यावर बसविण्यास सुरुवात झाली. याच ठेकेदारांनी नदीवर बांध टाकून कर्नाटकात वाळू वाहतूक केली होती. हा तर खूपच गंभीर प्रकार होता. परंतु, प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि ठेकेदार मोकाट सुटले. आज तेच लोक तहसीलदार दीपक वजाळे यांना दमदाटी करण्यापर्यंत पोहोचले आहेत. --------------------------दमदाटी ही तर नियमित बाबअक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर भागात वाळू ठेकेदारांना रोखणारे महसूल कर्मचारी दहशतीखाली असतात. कर्मचाºयांना दमदाटी ही नियमित बाब बनली आहे. जे वाळू ठेकेदारांसोबत जातात त्यांना मानाचे पान मिळते. आजही जिल्हाधिकारी कार्यालयात बंदूकधारी सुरक्षा असलेले ठेकेदार नेटाने फिरतात. अधिकारी त्यांना सन्मान देतात आणि दूरवरून आलेल्या तक्रारदाराला २ मिनिटात पिटाळतात. उत्तर भारतीय भागात दिसणारे हे चित्र आता जिल्ह्यातही दिसू लागले आहे. त्याला प्रशासनातील लोकच जबाबदार आहेत. ----------------------मुदतवाढ किंवा अनामत मिळणारच नाहीजिल्ह्यातील तीन ठेकेदारांनी अपेक्षित वाळू उपसा न झाल्याने मुदतवाढ मागितली आहे. यापैकी काहींनी अनामत रक्कमही परत मागण्यासाठी शासनाकडे अर्ज केल्याचे पत्रकारांना सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे म्हणाले की, वाळू उपशाची परवानगी देतानाच त्याला ठरवून दिलेल्या तारखेचे बंधन घालण्यात आलेले असते. काही लोकांनी शासनाकडे अर्ज केलाही असेल. परंतु, आम्ही त्यासंदर्भात नकारात्मक अहवाल पाठविणार आहोत. आम्ही सकारात्मक अहवाल दिलाच तर पुढे जाऊन आमच्यावर जबाबदारी निश्चित होईल. त्यामुळे असे काही होणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले. मागील काळात मुदतवाढीबाबत काय अहवाल देण्यात आले याबाबत माहिती नसल्याचेही ते म्हणाले. -------------------तर कारवाई झालीच नसती३० सप्टेंबरनंतर वाळू उपशाला बंदी आहे. अनधिकृतपणे सुरू असलेल्या वाळू उपशावर कारवाई सुरू आहे. प्रशासनाने दबाव तंत्राचा विचार केला असता तर कारवाई झालीच नसती. मंगळवारी पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी भागात ३ बोटी जाळण्यात आल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यात तहसीलदारांना दमदाटी करण्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लोकांना प्रवृत्त करणाºयांवरही गुन्हा दाखल होईल. तहसीलदारांनी पॉइंट तयार करून अवैध वाळू उपशावर नजर ठेवली आहे. आणखीही कारवाई होईलच, असे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.
अक्कलकोट तालुक्यातील वाळू ठेकेदार प्रशासनाला ‘डोईजड’, तहसिलदारांना केली दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:32 AM
अक्कलकोट तालुक्यातील आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या काही भागातील वाळू तस्कर जिल्हा प्रशासनाला डोईजड झाले आहेत. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाºयांच्या अर्थपूर्ण भूमिकेमुळे प्रशासनावर ही वेळ आली आहे.
ठळक मुद्दे तहसीलदार दीपक वजाळे आणि महसूल कर्मचाºयांना वाळू तस्करांनी दमदाटी३० सप्टेंबरनंतर वाळू उपशाला बंदी आहेअनधिकृतपणे सुरू असलेल्या वाळू उपशावर कारवाई सुरूप्रशासनाने दबाव तंत्राचा विचार केला असता तर कारवाई झालीच नसती