शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

सांगली, जतमधून आला सोलापुरात गवा; 'रेस्क्यू'साठी पाच जणांचे पथक दाखल

By appasaheb.patil | Published: January 31, 2023 4:46 PM

शहराकडे दाट लोकवस्ती असल्याने गवा इकडे येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी पुण्याहून 'रेस्क्यू'चे पाच जणांचे पथक आले आहे.

सोलापूर : देगाव परिसरातील देशमुख-पाटील वस्ती परिसरात आढळलेला गवा आता बेलाटी परिसरात गेला आहे. त्याला त्याच्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्यात येणार आहे. तरीही त्याने शहराकडे येण्याचा प्रयत्न केल्यास त्याला बेशुद्ध करण्यात येणार आहे. शहराकडे दाट लोकवस्ती असल्याने गवा इकडे येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी पुण्याहून 'रेस्क्यू'चे पाच जणांचे पथक आले आहे.

दरम्यान, गरज पडल्यास गव्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रँक्युलायजर गनची (बेशुद्ध करण्याची बंदूक) व्यवस्था करण्यात आली आहे. गव्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे पथकही सज्ज आहे. यासोबतच सोलापूर वन विभागाचे १५ तर पुण्यातील रेस्क्यू टीमचे ५ जण गव्याच्या हालचालींकडे लक्ष देत आहेत. गवा सांगली-जत या भागातून आला असण्याची शक्यता आहे. त्याच भागाकडे तो पुन्हा जावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहराकडे गवा येत असल्यास आवाज करणे, फटाके फोडणे आदी प्रयत्न करण्यात येत आहेत.

या गावातील नागरिकांनी घ्यावी काळजीबेलाटी, डोणगाव, कवठे गावाच्या परिसरात गव्याच्या पायाचे ठसे दिसले आहेत. या भागात गवा असू शकतो. गवा लाजाळू असल्याने स्वत:हून हल्ला करत नाही. मात्र, गोंधळ झाल्यास तो बिथरू शकतो. त्यामुळे या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, गवा दिसल्यास त्याला रस्ता मोकळा करून द्यावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

गवा तसा शांत व लाजाळू प्राणी आहे. त्याच्या मागे लोक लागल्यास तो बिथरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी गवा दिसल्यास त्याचा पाठलाग न करता त्याला जाण्यासाठी रस्ता करून द्यावा. हा गवा सांगली-जत भागातून आला असावा, म्हणून तो पुन्हा तिकडे जावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.- धैर्यशील पाटील, उपवन संरक्षक, वन विभाग, सोलापूर.

टॅग्स :Solapurसोलापूर