तत्कालीन उपसभापती तानाजी चंदनशिवे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसभापती पदाच्या निवडीसाठी बुधवारी निवड प्रक्रिया पार पडली. अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार अभिजित पाटील व सचिव म्हणून गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी काम पाहिले. सदर सभापती निवड ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
उपसभापती पदासाठी शेकापचे पं. स. सदस्य नारायण जगताप यांचाच अर्ज आला. यावेळी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्याने शेकापचे नारायण जगताप यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड केली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, चिटणीस विठ्ठलराव शिंदे, सभापती राणी कोळवले, बाजार समितीचे सभापती गिरीश गंगथडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, आनंदा माने, शशिकांत देशमुख, ॲड. भारत बनकर, संतोष देवकाते, दीपक गोडसे, हणमंत कोळवले, शाहनवाज तांबोळी, सचिन शिनगारे, डॉ. दादा जगताप आदी उपस्थित होते.
फोटो ओळ :
नूतन उपसभापती नारायण जगताप यांचा डॉ. अनिकेत देशमुख यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.