दरम्यान, सांगोला नगर परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शहरातील ७ संकलन केंद्रावर जमा झालेल्या सुमारे १५०० ‘श्रीं’ च्या मूर्तींचे विधिवत चिंचोली तलाव येथे विसर्जन केले. तर शहरातील घरगुती गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे जमा झालेल्या त्याच्या गणपतीचे माण नदीत विसर्जन करून बाप्पाला भक्तिभावाने निरोप दिला. अनेक भक्तांनी घरासमोरील तयार केलेल्या हौदात, भांड्यात गणपतीचे विसर्जन करून पर्यावरण पूरक गणपती विसर्जनाला महत्त्व दिले.
शहरातील ३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ४ फुटापर्यंत स्वतंत्र जागेत लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केली तर भक्तांनी दोन फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना होती. दरम्यान, सांगोला नगर परिषदेकडून कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर भक्तांनी सार्वजनिक विसर्जन ठिकाणी गर्दी न करता नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सात ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांवर भक्तांनी मूर्ती जमा कराव्यात असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे व नगराध्यक्षा राणी माने यांनी केले होते.
----
सांगोला शहरातील राहुल देवकर यांनी घरासमोर तयार केलेल्या हौदात बाप्पाला भक्तिभावाने निरोप देऊन विसर्जन करण्यात आले.