करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे अतिरिक्त २० ऑक्सिजन बेड तयार करणे, जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय येथे २० ऑक्सिजन बेडची सुविधा तयार करून स्टाफची नियुक्ती करणे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टी -१० बेड, जिंती - ३० बेड, वरकुटे - १० बेड तसेच जेऊर येथील जुन्या इमारतीमध्ये १० बेडसाठीची ऑक्सिजन सेंट्रल लाइन तयार करून आवश्यक साहित्य व साधनसामग्री तातडीने पुरवठा करून प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांना वापरता येणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार आमदार स्थानिक विकास निधी वापरण्यात यावा, असे आ. शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.
याबाबत मतदारसंघातही उलटसुलट चर्चा होत असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करून या सर्व सुविधा तालुक्याला मिळविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
----