शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

संजय राऊतांवर शारीरिक, मानसिक आघात होत असावेत; वाघ यांची बोचरी टीका

By appasaheb.patil | Published: January 08, 2023 1:11 PM

भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशच्या प्रमुख चित्रा वाघ आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.

सोलापूर : संजय राऊत हे खूप मोठ्या गॅपमधून बाहेर आले आहेत, त्याच्यावर शारीरिक, मानसिक आघात होत असावेत, त्याच्या परिणाम दूरगामी असतो. त्यातून ते अजून ही बाहेर आले नाहीत, त्यामुळे ते अशा पद्धतीचे वक्तव्य करत राहतात त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्यावर केली.

भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशच्या प्रमुख चित्रा वाघ आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास त्या उपस्थित राहणार असून तत्पूर्वी त्यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला. 

शिंदे - फडणवीस सरकार जोरदारपणे काम करत आहे. सरकार जाणार याबाबत मला काही माहिती नाही, पण संजय राऊत यांची झोप झाली नाही त्यांना झोपीची गरज आहे, झोप झाली की ते जागावर येईल ते व्यवस्थित बोलतील असेही चित्रा वाघ यांनी बोलले.शिंदे- फडणवीस सरकार हे फेसबुकवरच ऑनलाइन सरकार नाही, लोकांच्या फेसवरती स्माईल आणणारे सरकार आहे. ऑनलाइन सरकार नाही ऑनफीड सरकार आहे.  राज्यातील अनेक मंत्री हे मंत्रालयात न बसता ऑन फिल्डवर लोकांच्या समस्या व अडचणी याचबरोबर विकास कामे करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, एकेकाळी मी शरद पवार यांच्या सानिध्यात काम केलं आणि आता मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करीत आहे. देवेंद्र फडणवीस एक व्हिजन असणारा नेता आहे. महाराष्ट्राला एका यशाच्या शिखरावर पोहोचवणारा नेता असेल तर एकमेव देवेंद्र फडणवीस,आणि ते आमचे नेते आहेत त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाSolapurसोलापूर