कुर्डूवाडी : आपल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली, मात्र समोरचा विरोधक अजून ठरला नाही. अर्ज मागे घेण्यापर्यंत विरोधकांचा हा गोंधळ चालेल, अशी टीका संजय शिंदे यांनी केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल कॉर्पोरेशन येथे तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
प्रारंभी कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आ. बबनदादा शिंदे म्हणाले, येत्या तीन तारखेला अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवून मतदार याद्यांचे वाचन, फोन नंबर मिळवा, सर्वांशी संपर्क वाढवा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आ. विनायकराव पाटील, राष्टÑवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, शिवाजीराव पाटील, तुकाराम ढवळे, काँग्रेसचे धनंजय मोरे, अगरचंद धोका, मनोहर पाटील, प्रकाश गोरे, संतोष अनभुले, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुहास पाटील-जामगावकर, शंभूराजे मोरे, यशोदा ढवळे, गणेश काशिद, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, हर्षल बागल, अण्णासाहेब ढाणे, तानाजी नागटिळक, विजय शिंदे, वामनराव उबाळे, सुनील अवघडे यांची भाषणे झाली.