शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

Lok Sabha Election 2019; संजयमामांचा भाजपला नकार; पुन्हा रणजितदादांचा विचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:36 PM

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यासमोर स्पष्टपणे नकार दिल्यानंतर भाजपकडून पुन्हा ...

ठळक मुद्देमी राष्ट्रवादीला किंवा मोहिते-पाटलांना मदत करणार नाही : शिंदेमाढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचा विचार सुरू

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यासमोर स्पष्टपणे नकार दिल्यानंतर भाजपकडून पुन्हा एकदा माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचा विचार सुरू झाला आहे.माढा लोकसभेतील उमेदवारीबाबत भाजपामध्ये खलबते सुरूच आहेत. झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. पण मोहिते-पाटील भाजपामध्ये आल्यास तुमची भूमिका काय असेल या प्रश्नावर त्यांनी दोन दिवसांत महाआघाडीच्या नेत्यांशी    चर्चा करून निर्णय कळवितो असे सांगितले. महाआघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक होणार आहे. 

मोहिते-पाटील भाजपकडून उभारल्यास तटस्थ राहणार : शिंदे

  • - वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संजय शिंदे यांना म्हणाले, ‘माढ्यात भाजपाने सर्वप्रथम तुम्हाला प्राधान्य दिले आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही भाजपाची उमेदवारी घेण्याची तयारी दर्शविली आहे. तुम्ही काय करणार सांगा.’ त्यावर संजयमामा म्हणाले, ‘मला लोकसभेत नाही तर करमाळा विधानसभा मतदारसंघात रस आहे.’ 
  • - ‘मग आम्ही रणजितसिंहांना उमेदवारी दिली तर तुम्ही काय करणार,’ असे मुख्यमंत्र्यांनी विचारले असता संजयमामा म्हणाले,‘मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मला आमदार प्रशांत परिचारक, उत्तमराव जानकर, राजेंद्र राऊत, जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करावी लागेल. सर्वांशी चर्चा करून निर्णय कळवितो. हवे तर मी तटस्थ राहीन. मी राष्ट्रवादीला किंवा मोहिते-पाटलांना मदत करणार नाही.’
टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण