सीना नदीला आलेल्या महापुराने दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. नंदूर, समशापूरपासून हत्तुर, बिरनाळ, राजूर, संजवाड, बोळकवठा आधी गावातील शेतीलाही पुराच्या पाण्याने वेढले होते. नदीकाठच्या परिसरातील बहुतांशी पिके पाण्याबरोबर वाहून गेली आहेत. शेतकरी पाणी कधी कमी होते याची वाट पाहत शेताच्या बांधावर बसून आहेत, जसे पाणी ओसरत चालले तसे शेतातील पिकांची बांध बंधाऱ्याची दुरुस्तीच्या कामाला लागले आहेत पाणी ओसरताच शेतीची कामेही सुरू करण्यात आली.
--------
हजार एकर ऊस पाण्यात
पुराच्या पाण्याने सीना नदीकाठच्या शेतातील उडीद, तूर, सोयाबीन, मका ही पिके वाहून गेली आहेत. हत्तुर, समसापूर, नंदूर, राजूर, संजवाड, बोळकवठा येथील हजार एकर ऊस दोन दिवस पाण्यात होता. मंगळवारी सकाळपासून त्यातील पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली यात शेतीची खूप मोठी हानी झाली आहे.
------
नुकसानीचे पंचनामे करा
सीनेच्या पाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, उभी पिके पाण्याबरोबर वाहून गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती अशोक देवकते यांनी केली आहे.
-------
बंधारे मोडकळीस; पूल नादुरुस्त
गेल्यावर्षी सीना नदीला आलेल्या महापुराने रस्ते पूल नादुरुस्त झाले आहेत नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना इजा पोहोचली आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पुलांना आणि बंधाऱ्यांना भेगा पडल्या आहेत. वर्षभरात त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागाने पाहणी करून त्याच्या डागडुजीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे
.........
फोटो : सीना नदीच्या पुरामध्ये संजवाड पूल वाहून गेल्याचे दिसून येत आहे.
..........
फोटो : ०७संजवाड