शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
4
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
5
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
6
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
7
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
8
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
9
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
10
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
11
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
12
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
13
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
14
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
15
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
16
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
17
कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाली- "मी १०० टक्के दिले, पण..."
18
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
19
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
20
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता

संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी; पंढरपूर-घुमान रथ अन् सायकल यात्रेचा प्रारंभ

By काशिनाथ वाघमारे | Published: November 19, 2023 3:35 PM

या यात्रेचा प्रारंभ २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर होणार आहे.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर  : श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशी सुमारे २,१०० किलोमीटर रथ व सायकल यात्रा निघणार आहे. या यात्रेचा प्रारंभ २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर संत नामदेव महाराज यांच्या १७ वे वंशज हभप ज्ञानेश्वर माऊली नामदास यांच्या हस्ते पंढरपुरात उमा महाविद्यालय येथे सकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.

भागवत धर्माचे ज्येष्ठ प्रचारक, संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त ही सायकल यात्रा निघत आहे. भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. त्यांच्यासमवेत धर्मप्रसाराचे काम संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केले. पंजाबमधील शीख धर्मीयांमध्ये आपल्या सात्त्विक विचारांचा प्रभाव तेवत ठेवला. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने गतवर्षी भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही सायकल यात्रा सुरू झाली. भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव दरबार कमिटी (घुमान) व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संस्था-संघटनांच्या वतीने ही यात्रा निघणार आहे. या यात्रेत शंभर सायकलयात्री सहभागी होणार आहेत. ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी ११ डिसेंबर रोजी घुमान येथे पोचणार आहे.पंजाबचे राज्यपाल करणार स्वागत

या सायकल यात्रेचे नऊ डिसेंबर रोजी चंडीगड येथे पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे स्वागत करतील. त्यांच्या हस्ते पादुकांची पूजा होणार आहे. घुमान येथे १२ डिसेंबर रोजी या यात्रेचा समारोप होईल. २३ डिसेंबर रोजी रथयात्रा पंढरपूर येथे पोहोचेल

टॅग्स :Pandharpurपंढरपूर