वैराग : येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्याची सुमारे दोन कोटींची मालमत्ता लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला़ बंद अवस्थेत असलेल्या या कारखान्यातील मशिनरी चोरीस गेल्याचे लिलाव प्रक्रियेसाठी पाहणीस गेलेल्या पथकाच्या निदर्शनास आल्याने खळबळ उडाली़ कर्जात बुडालेल्या संतनाथ कारखान्याच्या वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मालमत्ता विक्रीच्या हालचालींना वेग आला आहे़ याबाबत बँकेने यापूर्वीच विक्री निविदा काढली आहे़या निविदा प्रक्रियेत सहभागी होणार्यांना कारखान्याची मालमत्ता दाखविण्यासाठी बँकेचे पाहणी पथक मंगळवारी कारखान्यावर आले होते़ या पाहणीदरम्यान कारखान्यातील इंजिनिअरींग, उत्पादन विभागातील अनेक मशिनरी जागेवर नसल्याचे दिसून आले़ मुंबई येथील एका कंपनीचे अधिकारी पाहणीसाठी आले होतेक़ामगार संघटनेच्या पदाधिकार्यांनी ही बाब बँकेचे अधिकारी कंक यांच्या निदर्शनास आणून दिली़ कामगार संघटनेचे नंदकुमार जाधव यांनी याबाबत बँकेच्या अधिकार्यांना जाब विचारताच वातावरण चांगलेच तापले़
------------------------------
थकबाकीचा प्रवास़़़़ ४३० सप्टेंबर २००९ अखेर राज्य सहकारी बँकेची १७२६ ़५० लाखांची थकबाकी आहे़या थकबाकीपोटी बँकेने कारखान्याची सर्व मालमत्ता ५ आॅगस्ट २०११ रोजी ताब्यात घेतली़ मध्यंतरी दोन वेळा बँकेने कारखान्याची मालमत्ता विक्रीचा घाट घातला होता़मात्र कारखाना बचाव कृती समितीने न्यायालयात धाव घेतल्याने विक्री प्रक्रिया रेंगाळली़ नंतर बँकेने कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी निविदा मागविल्या होत्या़मात्र एकाच वर्षाची मुदत असल्याने ही योजना बारगळली़ दरम्यान मालमत्ता विक्रीची जाहीर नोटीस प्रसिध्द झाली़ त्या अनुषंगाने मालमत्ता पाहणीसाठी मुंबईच्या एका कंपनीसह बँकेच्या पथकाने कारखान्यास भेट दिली़ कामगार संघटनेची आज बैठक ४कारखान्यातील मशिनरी चोरी प्रकरण उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनेने बुधवारी कारखाना स्थळावर तातडीची बैठक बोलाविली आहे़