करमाळा : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सपना रामटेके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी मिळाली. त्या ग्रंथपाल व माहिती तंत्रज्ञान विभागातून पीएच. डी.साठी सायटेशन अनालिसिस ऑफ पीएच.डी. थिसेस इन सोशल सायन्स अवॉर्ड बाय सोलापूर विद्यापीठ, सोलापूर या शीर्षकाअंतर्गत संशोधन करून विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता. संशोधनास मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रिन्स अगाशे यांनी मार्गदर्शन केले. सपना रामटेके या मूळच्या नागपूरच्या असून सध्या त्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. विद्या विकास मंडळाचे, सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांनी कौतुक केले.
फोटो : १० सपना रामटेके.