पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकोली येथील भीमानदीच्या पात्रातून टिप्पर चालक पांडुरंग प्रकाश गायकवाड (वय २३, रा. सरकोली, ता. पंढरपूर), टिप्पर मालक जीवन दत्तात्रय भोसले (वय ३२, रा. सरकोली, ता. पंढरपूर), रॅम्प मालक सागर माने (रा. सरकोली, ता. पंढरपूर) हे संगनमत करून भीमा नदीपात्रातून जलचर प्राण्यांना उपयुक्त असणाऱ्या वाळूचे शासनाच्या परवानगीशिवाय उत्खनन करत होते. १३ ए. एक्स् ४८७३ या क्रमांकाच्या टिप्परमध्ये ४ ब्रास वाळू भरून घेऊन जाताना टिप्पर चालक पांडुरंग प्रकाश गायकवाड हा पोलिसांना शनिवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास सरकोली येथील खटकाळी रोडवरील माने वस्तीजवळ मिळून आला. या कारवाईत १६ हजार रुपये किमतीची ४ ब्रास वाळू व १६ लाख रुपये किमतीचा टिन्पर जप्त करण्यात आला आहे. यामुळे वरील तिघांविरुध्द पोकॉ. हणुमंत भराटे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
आंबे येथील भीमानदीच्या पात्रातून वाळू९े अवैध्यरित्या उत्खनन करुन शासनाची परवानगी तसेच रयल्टी नसताना चालक विकास आण्णा गोडसे, महेश कोळी (रा. आंबे, ता. पंढरपूर) व चालक भैय्या उत्तम शिंदे, बिनु उर्फ शंकर लिंगा भोसले (सर्व रा. आंबे. ता. पंढरपूर) हे वाहनामध्ये वाळू घेऊन जाताना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास आनवली (ता. पंढरपूर) येथे मिळून आले आहेत. या कारवाईत ६ लाख ५० हजार रुपये किमतीची ए. ए. १० ए. क्यू. ८०३७ व ए. ए. १३ सी यू १३७८ ही वाहने व ६ हजार रुपये किमतीची ए. ब्रास वाळू असा एकूण ६ लाख ५६ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन वरील चौघांविरुध्द पोकॉ. पंजाब सुर्वे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ ढवळे करीत आहेत.