ग्रामसेवक अंगद बळीराम सरडे (वय ४६) चिखलठाण नं २ (ता.करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी राजेंद्र भोंग यांच्यासमोर काम करत होतो. २८ जून रोजी सकाळी करंजे येथील राजेंद्र रूपचंद जाधव तिथे आले व अरेतुरेची भाषा बोलत, ‘तू भालेवाडी-करंजे येथील सरपंचाबद्दल काहीही वरिष्ठ कार्यालयात रिपोर्ट का देतो, माझी मंडळी सरपंच आहे, मी तिचा नवरा आहे, माझी सही तुला चालत नाही का? बायकोच्या सहीची तुला काय गरज आहे व सरपंचाला तू हजर राहण्याबाबत नोटीस का देतो, पत्रव्यवहार का करतो?’ असे म्हणून माझ्या अंगावर धावून येऊन तोंडावर हाताने व डाव्या पायावर लाथाबुक्क्याने मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत.
----