या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी सरपंच अस्लम चौधरी व पांडुरंग काकडे यांनी सत्ताधारी सर्वपक्षीय महाविकास आघाडी विरुद्ध कडवी झुंज देत १३ पैकी १० जागा मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले होते. सरपंचपदी सपाटे यांची निवड निश्चित होती मात्र उपसरपंचपदी कोणाला संधी मिळणार याची ग्रामस्थांमध्ये उत्सुकता होती. अखेर उच्च शिक्षित असलेल्या अश्विनी म्हेत्रे यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले. यावेळी माजी सदस्य दत्तात्रय चव्हाण, श्रावण गवळी, ॲड. गौरंग काकडे, नागनाथ माने, लहू म्हेत्रे, पापू ताकमोगे, सिद्धेश्वर लाड, अंकुश पाटील, जगदीश कुलकर्णी, सिद्धेश्वर जगताप, लहू गवळी, प्रकाश सपाटे, सोमनाथ कसबे, बाळासाहेब जामदार, समद बागवान, इरफान बागवान, अब्दुल रहिमान शेख, शंकर सरवळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागनाथ कुंभार उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिंदे, तलाठी गणेश साठे, ग्रामविकास अधिकारी हरीश पवार यांनी काम पाहिले.
फोटो
२४बेगमपूर - वंदना सपाटे सरपंच
२४बेगमपूर: अश्विनी म्हेत्रे उपसरपंच