अरूण बारसकरसोलापूर दि ४ : उपसरपंच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास व त्यांना समान मते मिळाली तरच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास दिले आहे. यामुळे जिल्ह्यातील उपसरपंचपद बहुमत असणाºयांना मिळणार हे नक्की झाले आहे.राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या असून थेट सरपंचांच्या निवडीही प्रथमच झाल्या आहेत. अनेक गावात सरपंच एका गटाचा तर अधिक सदस्य दुसºया गटाचे विजयी झाले आहेत. यामुळे उपसरपंच निवडीसाठी सरपंचांची भूमिका काय?, असावी असा प्रश्न राजकीय व प्रशासकीयांना पडला होता. त्यावर अनेकांनी ग्रामविकास खात्याला स्पष्टीकरण मागविले होते. त्यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी एक नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढले असून त्यामध्ये सरपंच हा पदसिद्ध सदस्य राहील असे म्हटले आहे. ------------उपसरपंच निवडीबाबत सूचना..उपसरपंच निवडीच्या बैठकीचे अध्यक्ष हे सरपंच असतील.- सरपंचपद रिक्त असेल तर निवडणूक अधिकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतील.- उपसरपंचाच्या निवडणुकीसाठी समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा सरपंचाला अधिकार- सरपंचाला सदस्य म्हणून एक मत व समसमान मते झाल्यास निर्णयाक मताचा वापर करता येणार नाही.- मतदानाची वेळ आल्यास सरपंचाला मतदानात भाग घेता येणार नाही.
समसमान मते पडली तरच सरपंचाला मताचा अधिकार, उपसरपंच निवडीसाठी ग्रामविकास खात्याची नियमावली प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:39 PM
उपसरपंच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास व त्यांना समान मते मिळाली तरच सरपंचांना मतदानाचा अधिकार राहील असे स्पष्टीकरण राज्याच्या ग्रामविकास दिले आहे.
ठळक मुद्देराज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्याअनेक गावात सरपंच एका गटाचा तर अधिक सदस्य दुसºया गटाचे विजयी सरपंच हा पदसिद्ध सदस्य राहील