घरकुल जागेचे महसुली पुरावे नसल्याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर याबाबतची सुनावणी १३ ऑगस्ट २०२१ रोजी मा. उपायुक्त आस्थापना (पुणे विभाग पुणे) यांच्या कार्यालयात झाली होती. त्यानुसार पानीव गावातील ५९ घरकुलधारकांना महसुली पुरावे जमा करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीने दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गावातील मागासवर्गीय समाजातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी ऑल इंडिया मातंग सेनेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
या घरकुलांबाबत गावात कसलीच अडचण नाही. आजपर्यंतची रीतसर घरपट्टी आम्ही ग्रामपंचायतकडे जमा केली आहे. असे असताना आमच्या विरोधात तक्रार दाखल करून आम्हाला वेठीस धरून गावातीलच काही व्यक्ती नाहक त्रास देत असल्याची तक्रार निवेदनातून केली आहे.
कोट :::::::::::::::
सदर घरकुलाच्या जागेबाबत अनेकदा तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत पंचायत समिती प्रशासनाने आम्हाला कळविले आहे. त्यानुसार संबंधित घरकुलधारकांना तशा सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत संबंधित घरकुल लाभार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. हा विषय फक्त पानीवपुरता असू शकत नाही. तर संपूर्ण महाराष्ट्राचा असेल आणि मग फार कमी गोरगरिबांना घरकुल लाभ मिळेल.
- श्रीलेखा पाटील
सरपंच, ग्रामपंचायत पानीव
कोट :::::::::::::::::::::::
माझ्याकडे पानीव येथील निवेदन आले आहे. त्यांच्यासह उभय बाजूंच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची शहानिशा करून प्रशासन सर्वसमावेशक उचित कार्यवाही करेल.
- श्रीकांत खरात
गटविकास अधिकारी, माळशिरस