माळीनगर येथील दी सासवड माळी शुगर फॅक्टरीने गेल्या वर्षी ३ लाख ७६ हजार मे. टन उसाचे गाळप करून ३ लाख ९० हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले. त्यामधून साखर उतारा १०.३८ टक्के निघाला आहे. चालू गळीत हंगामामध्ये आजअखेर ३ लाख ८० हजार मे. टन उसाचे गाळप करून १०.८० टक्के साखर उतारा निघाला आहे. उसापासून २० लाख, तर धान्यापासून २३ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यात आले आहे.
२ कोटी २० लाख युनिट विजेची विक्री
कारखान्याने ५० लाख लिटर ऑइल कंपनीकडे विक्री करण्यासाठी निविदा भरली आहे, तसेच सहवीज प्रकल्पातून कारखान्यांनी २ कोटी २० लाख युनिट विजेची विक्री केली आहे. कारखान्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे कारखाना प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. वातावरणातील बदलामुळे उसाच्या टनेजमध्ये आता घट दिसून येत आहे. सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप करणार आहे. कारखाना चालू हंगामामध्येेेे साडेपाच लाख मे. टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप करील, अशी माहिती मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांनी दिली.
कोट ::::::::::::::::
कारखान्याकडे ६० टक्क्यांपेक्षा जास्त २६५ जातीचा ऊस गाळपासाठी येत असूनही साखर उतारा चांगला निघत आहे. त्याचे कारण योग्य नियोजन व तोडणी व्यवस्थापन केल्यामुळे उताऱ्यात वाढ होत आहे. बी-हेवी इथेनॉल धरून १०.८० टक्के साखर उतारा निघत आहे.
- राजेंद्र गिरमे
मॅनेजिंग डायरेक्टर, दी सासवड माळी शुगर फॅक्टरी, माळीनगर