शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

‘कोरोना’च्या भीतीने सौदीने रोखली सोलापूरच्या १५० भाविकांची उमरा यात्रा

By appasaheb.patil | Published: March 02, 2020 12:37 PM

दक्षतेसाठी सौदी सरकारने घेतला निर्णय; व्हिसा केला अनिश्चित काळासाठी रद्द

ठळक मुद्देचीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू सौदी सरकारने ‘उमरा’ व पर्यटनासाठीचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतलाकोरोना आटोक्यात आल्यानंतर प्रवासासाठी परवानगी दिली जाईल, असे सौदी सरकारने स्पष्ट केले

सुजल पाटील सोलापूर : चीनमधील कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका आता सोलापुरातून मक्का, मदिना येथे धार्मिक यात्रेसाठी (उमरा) जाणाºया मुस्लीम बांधवांना बसला आहे. सौदी अरेबिया सरकारने गुरुवारी भारतासह आशिया खंडातील देशांतील नागरिकांना अनिश्चित काळासाठी प्रवेशबंदी घातली आहे. त्यासाठी सौदी दूतावासाकडून जारी केलेला उमरा आणि पर्यटनासाठीचा व्हिसा अनिश्चित काळासाठी निलंबित केला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील १५० मुस्लीम बांधवांचा प्रवास रद्द झाल्याची माहिती सोलापूर हज कमिटीचे व्हा़ चेअरमन अल्ताफ सिद्दीकी यांनी दिली.

चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. लाखांहून अधिक जणांना त्याची लागण झाली. त्यामुळे सौदी सरकारने जगभरातून त्यांच्याकडे येणाºया भाविकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ‘उमरा’ व पर्यटनासाठीचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  कोरोना आटोक्यात आल्यानंतर प्रवासासाठी परवानगी दिली जाईल, असे सौदी सरकारने स्पष्ट केले. भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, चीन, जपान, थायलंड, कोरिया, इटली, इराण, येमेन, फिलिपिन्स आदी देशांच्या नागरिकांवरही बंदी घालण्यात आली. त्यामुळे सोलापुरातून जाणाºया १५० मुस्लीम बांधवांना आपला प्रवास रद्द करण्याची वेळ आली आहे़ या निर्णयामुळे १५० लोकांचे आर्थिक कोणतेही नुकसान झाले नाही; मात्र प्रवास रद्द झाल्याची खंत बांधवांनी व्यक्त केली.

असा होता सोलापूरकरांचा नियोजित उमरा दौराउमरा येथे जाणाºया मुस्लीम बांधवांनी मागील काही दिवसांपूर्वी पासपोर्ट काढला होता़ पासपोर्टच्या आधारे उमरा येथे जाण्यासाठी हज कौन्सिल कमिटीकडे व्हिसा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होता़ व्हिसा मिळाल्यानंतर विमानाचे बुकिंग करण्यात येणार होते़ मुंबई ते जेद्दाह असा विमान प्रवास करून बसने मक्का येथे पोहोचतात़ मक्का येथे ७ दिवस राहून तेथून बसने मदिना येथे पोहोचण्याचे नियोजन होते़ मदिना येथे धार्मिक विधीसाठी ७ दिवस मुक्काम करून पुन्हा जेद्दाह ते मुंबई असा प्रवास करण्याचे नियोजन होते़ त्यानुसार सर्व कागदपत्रे, आर्थिक कागदपत्रे, पासपोर्टची पूर्तता करण्यात आली होती, एवढेच नव्हे तर सोलापूर ते मुंबईला जाण्यासाठीचे रेल्वेचे तिकीटही काढले होते़ मात्र सौदी सरकारचे व्हिसा रद्द केल्याचे पत्र मिळाले अन् प्रवास थांबविण्याचा निर्णय घेतल्याचे अल्ताफ सिद्दीकी यांनी सांगितले़ 

सोलापूर शहर व जिल्ह्यातून सुमारे १५० मुस्लीम बांधव १ मार्च २०२० रोजी उमरा येथे जाण्यासाठी तयार होते़ मात्र तीन दिवसांपूर्वी सौदी सरकारने व्हिसा देण्यावर बंदी घातल्याचे पत्र मिळाले अन् १५० जणांचा प्रवास थांबविण्याचा निर्णय घेतला़ आता व्हिसा कधी सुरू होणार यावर पुढील प्रवास अवलंबून आहे़ मात्र कोरोना यावर प्रतिबंध घालण्यासाठी सौदी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे़ लवकरच व्हिसा देणे सुरू होईल अन् मुस्लीम बांधवांची उमरा यात्रा सुखकर होईल़- अल्ताफ सिद्दीकी,व्हा़ चेअरमन, हज यात्रा कमिटी, सोलापूर 

आम्ही शनिवारी सोलापूर ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करून रविवार १ मार्च रोजी आमचे उमराला जाण्यासाठीचे विशेष विमान होते़ त्यादृष्टीने रेल्वे तिकीट, व्हिसा, लागणाºया साहित्यांची तयारी केली होती़ मी स्वत:, पत्नी, मुलगी व भाऊ असे चौघे उमराला जाणा

र होतो़ मात्र २७ फेबु्रवारी रोजी व्हिसा रद्द केल्याचे सांगण्यात आले अन् मी नाराज झालो़ कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका बसल्याचे सांगण्यात आले़.- अब्बास कुरेशी, सोलापूर (उमरा यात्रेला जाणारे मुस्लीम बांधव) 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाMuslimमुस्लीमsaudi arabiaसौदी अरेबिया