पंढरपूर : वाखरी (ता. पंढरपूर) येथील बाजीराव विहीर जवळपास २०० वर्ष जुनी आहे. ती नियमानुसार प्राचीन स्मारकाच्या व्याख्येत मोडते. ती नष्ट करु नये, असे पत्र राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वि. पुं. वाहणे यांनी दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील वाखरी येथे मध्ययुगीन काळातील जुनी बाजीराव विहीर ही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदिकरणाच्या कामात नष्ट होण्याची भिती निर्माण झाली आहे. पंढरपूर यथील श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या पुजेसाठी तुळशी फुलांचा बाग वाखर येथे केला होता. व त्याच जमिनीत विहीर असल्याने ही विहीर विठ्ठलाच्या सेवेसाठी दुसरे बाजीराव पेशवे यांनी अर्पण केलेली ऐतिहासिक विहीर आहे. या विहीरीवरुन जाणारा राष्टÑीय महामार्ग विहीरस वळसा घालून पेढे न्यावा अशी विनंती इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ञ राज मेमाणे यांनी पत्रान्वये केली आहे.
बाजीराव विहीरीच्या पायऱ्या विहीरीतल उत्तम बांधकामाचा नमुना आहे. विहीर जवळपास २०० वर्ष जुनी आहे. ती नियमानुसार प्राचीन स्मारकाच्या व्याख्येत मोडते. ही विहीर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदिकरणाच्या कामात नष्ट करण्यात येऊ नये. याबाबत संबंधितास उचित आदेश करुन प्राचीन वारसा जपण्यास सहकार्य करावे असे पत्र सोलापूर जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकृत अधिकारी यांना पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वि. पुं. वाहणे यांनी दिले आहे.