पोलीस सूत्रानुसार, २ जून रोजी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी परिसरात सहाय्यक फौजदार सुनील चवरे हे नाईट राऊंड करीत असता पहाटे पावणेसहाच्या सुमारास एमएच १३ एजे ८०९६ या ट्रॅक्टरमध्ये शासनाचा परवाना नसताना चोरून वाळू घेऊन जात असल्याचे लक्षात आल्याने ट्रॅक्टर चालक नितीन पांडुरंग चटके (रा. पोफळी) याला ताब्यात घेऊन ५ हजार रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर व ट्रॉली असा ७ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलीस अयुब मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि कलम ३७९ पर्यावरण संरक्षण कलम ९, १५ अन्वये गुुन्हा नोंदला आहे. ट्रॅक्टर चालकास न्यायालयासमोर उभे केले आसता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास सहायक फौजदार सुनील चवरे करीत आहेत.