मकर संक्रांतीनिमित्त लोक एकमेकांना तीळगूळ वाटतात. तिळाचा स्नेह व गुळाची गोडी बोलण्यात यावी. यासाठी प्रतीक म्हणून ह्यतीळगूळ घ्या, गोड बोलाह्ण म्हणतात़ सर्वांशी गोड बोलावे, ही सभ्यता आहे.
गोड बोलण्यामुळे ऐकणारा व बोलणारा आनंदित होतो. क्रोध, द्वेष, मत्सर निर्माण होत नाही. त्यामुळे त्यातून कलह निर्माण होत नाही. सर्व कलहाचे मूळ कटू बोलणे आहे. एक राजा होता. तो आजारी पडला. एक वैद्य आला. त्याने राजाला तपासले व सांगितले, ह्यतू एक महिन्यात मरणार आहेस.ह्ण ते कटू वचन ऐकून राजा संतापला व त्याने त्या वैद्याला हाकलून दिले. नंतर दुसरा वैद्य आला, ह्यराजा तू मृत्युंजयाचा जप कर मरणार नाहीसह्ण या गोड बोलण्याने राजाला धैर्य आले. त्याची जगण्याची ऊर्मी वाढली व तो जगला़ हा गोड बोलण्याचा परिणाम, गोड बोलण्याने धैर्य वाढते.
निराशा दूर होते़ उत्साह वाढतो़ तीळगूळ वाटल्याने माणसांमध्ये चांगला बदल व्हावा. काम, क्रोध, लोभ वगैरे विकार जावेत व प्रेम, मैत्री, सद्भावना निर्माण व्हावी हाच तीळगूळ घ्या, गोड बोला यामागचा हेतू आहे. गोड बोलण्यानेच मैत्री होते म्हणून गोड बोला, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे।। असे तुकाराम महाराज म्हणतात.
सत्य बोलावे, पण ते प्रिय असावे. अप्रिय सत्य बोलू नये. पण प्रिय असले तरी असत्य बोलू नये. सर्वांशी गोड बोलणारी माणसे सर्वांना प्रिय होतात. कटूसत्य बोलणारे विदूर कौरवांना अप्रिय झाले. पाणी हे भूषण आहे. कोकिळेची वाणी गोड आहे. म्हणून ती सर्वांना प्रिय आहे. त्यामुळे मकरसंक्रातीला तीळगूळ घ्या, गोड गोड बोला.. असे म्हणतात़- वा. ना. उत्पात