सोलापूर : मध्य रेल्वेतील मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जीद दरम्यान अप लाइन आणि डाऊन लाइन, अप आणि डाऊन थ्रू लाइन्स वरील पूल तोडण्याच्या कामाकरिता १९ व २० नोव्हेंबर २०२२ रोजी ट्रॉफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॉफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे १९ व २० नोव्हेंबर रोजी सोलापूर विभागातून धावणा-या मेल एक्सप्रेस गाड्या रद्द/शार्ट टर्मिनेट करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
याशिवाय चेन्नई सेंट्रल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दादर स्थानकापर्यन्त, हैदराबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दादर स्थानकापर्यन्त, गदग- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यन्त, सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यन्त तर तिरुअनंतपुरम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यन्त धावणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चेन्नई एगमोर एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लातूर एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - तिरुअनंतपुरम एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गदग एक्सप्रेस पुणे स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर एक्सप्रेस पुणे स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एगमोर एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हैदराबाद एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लातूर एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - तिरुअनंतपुरम एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गदग एक्सप्रेस पुणे स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटणार आहेत.रदद् करण्यात आलेल्या गाड्या...
- हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस रद्द.- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हैदराबाद एक्सप्रेस रद्द.