कोरोना महामारीमुळे मुलांचे मोठ नुकसान होत आहे. यासाठी झेडपीच्या गुरुजींनी ऑनलाइन शिक्षण फंडा राबविला. मात्र, यात फारसे यश मिळाले नसल्यामुळे काही ठिकाणी झाडाखाली, मंदिरात मर्यादित विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत शिक्षण दिले जात आहे. १०० हून अधिक शाळांत गुरुजी स्वयंस्फूर्तीने पालकांच्या मदतीने मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. महामारीच्या भीतीमुळे पुन्हा १०० शाळेतीत विद्यार्थी झाडाखाली शिक्षण घेण्याची धडपड करीत आहेत.
---
शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबतीत प्रशासनाने विशेष लक्ष घालून प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत शाळा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, प्रशासन अद्याप या बाबतीत उदासीन का ? गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन शाळा सुरू करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
-रामचंद्र बंडगर, पालक तिरवंडी