दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी, यत्नाळमध्ये असाच उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर दिसून आला. येथील सर्व मैत्रिणींनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला.
कर्देहळ्ळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या नृसिंह विद्यालयात विद्यार्थ्यांचे रांगोळीच्या पायघड्या घालून, त्यांना फुले देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख कुंदा राजगुरु, सरपंच नागेश शिंदे, मुख्याध्यापक बाळू व्हनमाने, सहशिक्षक भारत केत, काशीबाई पुजारी, जयश्री महाबोले, जयश्री शिंदे, चांगदेव पोळ, जिजाबाई शिंदे, प्रियांका सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी रांगेत वर्गावर जाताना कोरोनाला बाय बाय केला. शाळेची घंटा वाजताच मुलांनी वर्गात जाण्यासाठी एकच धूम ठोकली. आठवी ते दहावीचे जवळपास दीडशे विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कागदी विमान आकाशात उडवित एकच जल्लोष केला. यत्नाळ येथील व्यंकय्या गुत्तेदार माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी हातात लाकडी पट्टी धरून फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत मनसोक्त फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.