शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

शाळकऱ्यांनो दोन नव्हे यंदा एकच गणवेश मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:21 AM

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा ह्या खूप उशिराने सुरू झाल्या आहेत. त्यातही प्राथमिकचे काही वर्ग अद्यापही भरलेले नाहीत. परंतु ...

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा ह्या खूप उशिराने सुरू झाल्या आहेत. त्यातही प्राथमिकचे काही वर्ग अद्यापही भरलेले नाहीत. परंतु ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषदेच्या व नगरपालिकेच्या इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व शाळांना दरवर्षी शासन सर्व जातींच्या मुली, अनुसूचित जाती मुले, अनुसूचित जमाती मुले व दारिद्र्य रेषेखालील मुलांना दोन गणवेशासाठी ६०० रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असते. यंदा कोरोनाची परिस्थिती असल्याने व उशिराने शाळा सुरू झाल्याने शासनाने एकाच गणवेशासाठी शालेय व्यवस्थापनाकडील खात्यावर अनुदान पाठविलेले आहे. ते येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या खात्यावर जमा देखील झाले असल्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी सांगितले.

याबाबत येथील तालुका स्तरावर सभापती विक्रमसिंह शिंदे, उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील व गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या समवेत तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांची बैठक पार पडली. गणवेशाबाबत कार्यवाही सुरू झाली आहे.

---

असे आहेत लाभार्थी

माढा तालुक्यात सापटणे (भो),माढा, दारफळ, उपळाई (बु), अंजनगाव (खे), मानेगाव, कुर्डू, म्हैसगाव, बारलोणी, कव्हे, रोपळे, मोडनिंब, अरण, लऊळ, परिते, वरवडे, उजनीनगर, आढेगाव, बेंबळे, पिंपळनेर, निमगाव (टे) व नगरपरिषद कुर्डूवाडी अशी एकूण २२ केंद्रे आहेत. त्यामध्ये लाभार्थी मुलींची संख्या ही ९ हजार ९८८, अनुसूचित जाती मुले १ हजार ७७१ तर अनुसूचित जमाती मुलांची संख्या १३६ तर दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ८०५ अशा प्रकारे एकूण लाभार्थी विद्यार्थी संख्या ही १३ हजार ७०० इतकी आहे. त्यांना आता एक गणवेश लवकरच मिळणार आहे.

---

अन्य लाभार्थींना लोकसहभागातून गणवेश

संबधित लाभार्थी सोडून तालुक्यात खुल्या वर्गातील, ओबीसी प्रवर्गातील, एसबीसी व व्हीजेएनटी वर्गातील ६ हजार ९३९ विद्यार्थी आहेत. त्यांनाही दरवर्षी प्रमाणे लोकसभागातून एक गणवेश देणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी फडके यांनी यावेळी सांगितले.

..............

कोट-

शासन स्तरावरून यंदा माढा तालुक्यातील १३ हजार ७०० लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशासाठी ४१ लाख १० हजार रुपयांचे निधी प्राप्त झाला आहे. लवकरच त्यांंना गणवेश मिळेल.

- मारुती फडके

(गटशिक्षणाधिकारी,माढा)