सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात तेरा वर्षाच्या शाळकरी मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याची फिर्याद स्वत: मुलीनेच पोलिसांकडे केली आहे़ याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली.
ही शाळकरी मुलगी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेला जात असताना पाठीमागून दुचाकीवर दोन तरुण आले, त्यांनी तुला वडिलांनी घरी बोलावले आहे असे सांगितल़े़ दोन्ही तरुण परिचयाच्या असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. दुचाकीवर बसवून घरी नेण्याचा बहाणा करीत त्यांनी ही दुचाकी एका शेताकडे वळवली आणि तिच्यावर अत्याचार केला अशी तक्रार या मुलीने मोबाईलवरून पोलिसांना दिली़याप्रकरणाची दखल घेत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात रात्री उशिराने गुन्हा दाखल करून घेण्यात आला. पोलिसांनी तातडीने हालचाल करीत संबंधित दोन संशयितांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.