सोलापूर: माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने घेतलेल्या तपासणीत ग्रामीण भागात १0 हजार ७९९ शिक्षक़ांच्या अॅन्टीजेन व प्रयोगशाळेच्या चाचणीत १७८ शिक्षक पॉझीटीव्ह आढळले आहेत. यात पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक तर त्या खालोखाल माळशिरस आणि मंगळवेढा तालुक्यातील शिक्षकांची संख्या मोठी आहे.
शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले विषय शिक्षक व कर्मचाºयांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागातर्फे ग्रामीणमधील आरोग्य केंद्र व नगरपालिका क्षेत्रातील केंद्रात ११४ ठिकाणी चाचणीची सोय केली होती. शुक्रवार व शनिवारी सर्वाधिक म्हणजे १0 हजार ७९९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी अॅन्टीजेन चाचण्या केल्या. यामध्ये १७६ शिक्षक पॉझीटीव्ह आढळले आहेत. यातील ३ हजार ४0६ शिक्षकांमध्ये लक्षणे दिसल्याने आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.
प्रयोगशाळेतून या चाचणीचे निकाल येण्यास रविवार उजाडणार आहे. फक्त मंगळवेढा तालुक्यात दोन शिक्षक या चाचणीत पॉझीटीव्ह आले आहेत.
तालुकानिहाय झालेल्या
चाचण्या व पॉझीटीव्ह शिक्षक
अक्कलकोट: १0४0 (२), बार्शी: १९१८ (१५), करमाळा: ४२२ (२), माढा: ९३२ (१0), मोहोळ: ७१७ (५), माळशिरस: १११२(२0), मंगळवेढा: ८४१ (२२), उत्तर सोलापूर: ३९४ (११), पंढरपूर: १५४0 (६६), सांगोला: ११२२ (२१), दक्षिण सोलापूर:७६१ (४).
करमाळा तालुक्यात फक्त दोन
करमाळा तालुक्यात कमी चाचण्या झाल्या तरी फक्त दोन शिक्षक पॉझीटीव्ह आले आहेत. अक्कलकोटमध्येही दोन तर दक्षिण सोलापुरात चार शिक्षक पॉझीटीव्ह आढळले आहेत. पंढरपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे सहासष्ट तर त्याखालोखाल मंगळवेढा व माळशिरस तालुक्यात पॉझीटीव्हची संख्या आहे.
सोलापुरातील शिक्षक निगेटीव्ह
सोलापूर शहरात १७ ते २१ नोव्हेंबरपर्यंत १ हजार १९९ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ३३० अहवाल प्राप्त झाले असून सर्व शिक्षक निगेटीव्ह आहेत. उर्वरित ८६९ शिक्षकांचा अहवाल अद्याप यायचा आहे.