शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

कोरोना रुग्ण आढळताच सोलापुरातील शाळा सतर्क; पुन्हा तोंडावर मास्क, प्रवेशद्वारावर सॅनिटायर

By काशिनाथ वाघमारे | Published: March 16, 2023 6:37 PM

 सोमवारी घेण्यात आलेल्या रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये आठ रुग्ण कोरोनाने बाधीत आढळून आले.

सोलापूर - सोमवारी घेण्यात आलेल्या रॅपीड अँटीजन टेस्टमध्ये आठ रुग्ण कोरोनाने बाधीत आढळून आले. यात तीन पुरुष आणि पाच महिला असून एका बाधीत महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर सोलापूर शहरातील शाळा, महाविद्यालयासह पालक- विद्यार्थी सतर्क झाले आहेत. गुरुवारी अनेक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने मास्क घालून शाळेत प्रवेश करताना आढळून आले. काही शाळांनी सकाळी प्रार्थनेवेळी विद्यार्थ्यांना खबरदारीच्या सूचना केल्या.

शहरात कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आले. शेळगीत कामगारांच्या मुलांसाठी ओळखली जाणाऱ्या एस.के. बिराजदार प्रशालेतील विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने मास्क घालून आले. याशिवाय आसरा परिसरातील सुरवसे प्रशाला, जुळे सोलापूरमधील वि.मो. मेहता प्रशाला आणि भारती विद्यापीठमधील अनेक विद्यार्थी सकाळी मास्क घालून प्रवेश करताना आढळून आले. एस.के. बिराजदार प्रशालेत विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेली खबरदारी पाहून मुख्याध्यापकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर पंप बसवला.

रुग्णसंख्या २९ वर कॉन्टॅक्ट ट्रेसींग सुरू

बुधवारपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ही १५ वर होती. ती आज २९ वर असून या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचे ट्रेसींग सुरू केले असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी दिली. संबंधीतांच्या चाचण्या केल्या जात असून नई जिंदगी परिसरात स्वच्छता आणि औषध फवारणीच्या सूचना दिल्या आहेत. मागील कोरोना काळात लसीकरण झाल्याने २९ पैकी एकच रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे. बाकी रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना होम आयसोलेशन केल्याचे लोहारे यांनी सांगितले.