कुर्डूवाडी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या अधिपत्याखाली शहरात कार्यालयीन अधीक्षक अतुल शिंदे, स्वच्छता निरीक्षक तुकाराम पायगन, पाणीपुरवठा विभागप्रमुख कोमल वावरे व आरती वाल्मिकी आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण ६ पथके तयार केली आहेत.
प्रत्येक पथकामध्ये ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शहरात सकाळी ११ नंतर जे दुकाने चालू राहील त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. गुरुवारी यामध्ये गणेश वस्त्र भंडार हे मागील दाराने दुकान चालू असल्याने त्याच्यावर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्याचबरोबर वाॅर्ड क्रमांक ३ मधीलच भाजी मंडई येथील बालाजी मोबाईल शॉपीही सील करण्यात आली आहे. ही कारवाई पथक प्रमुख विनोद जोगदंड, स्वछता दूत अविनाश गोडगे, महादेव खवळे, कृष्णा कांबळे, उमा शिंदे आदींनी केली.
---
शहरातील नागरिकांनी जीवापेक्षा अत्यावश्यक काहीच नाही. त्यामुळे खूपच गरज असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा घराबाहेर पडू नका. सॅनिटायझर वापरावे. मास्कचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे.
- समीर भूमकर , मुख्याधिकारी, नगरपालिका कुर्डूवाडी
----२९कुर्डूवाडी-ॲक्शन
कुर्डूवाडी शहरात चोरून आपली दुकाने उघडून व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करताना स्वच्छता निरीक्षक तुकाराम पायगण व त्यांचे पथक.