मोहोळ नगर परिषदेच्या वतीने थकबाकी वसुली मोहीम तीव्र केली आहे. शहरातील बुधवार पेठ येथे असलेल्या एका खासगी मोबाईल कंपनीच्या टॉवरची दोन वर्षाची थकबाकी न भरल्याने त्याचे कंट्रोल रुम नगरपरिषदेने सील केले.
मोहोळ शहरामध्ये प्रभाग निहाय सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून दुकाने, गाळे, टॉवर तसेच थकीत कर असलेल्या वरती कारवाई करणे सुरू आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी आपली थकबाकी भरून नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी केले.
यावेळी कर निरीक्षक सुवर्णा हाके, रोहित कांबळे, योगेश खराडकर,
संगणक अभियंता महेश माने, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, पाणीपुरवठा अभियंता अमित लोमटे, दिलीप जाधव, संगीता कुंभार, बालाजी काटकर, महेश भोसले, राजू शेख, गोवर्धन अष्टुळ, मंजुषा माळी, दानोळे आदी कर्मचारी उपस्थित होते.
फोटो
२७मोहोळ-टॉवरला सील
मोहोळ येथील खासगी मोबाईल कंपनीने थकीत रक्कम भरली नसल्याने त्याचे टॉवर सील करताना नगर परिषदेचे कर्मचारी.