शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

सुभाष देशमुख यांच्याशी लढत देण्यासाठी काँग्रेसमध्ये उमेदवाराची शोधमोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 3:11 AM

सोलापूर शहराचा हद्दवाढ भाग, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५६ गाव आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ गावांचा मिळून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ बनला आहे.

नारायण चव्हाणसोलापूर : सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व केलेले काँग्रेसचे दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला शोधमोहीम हाती घ्यावी लागत आहे. शिवाय काँग्रेसचेच बाळासाहेब शेळके आणि राजशेखर शिवदारे अन्य पर्यायाचा शोध घेत असल्यामुळेही पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.

सोलापूर शहराचा हद्दवाढ भाग, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५६ गाव आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ गावांचा मिळून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ बनला आहे. पुनर्रचित सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाने जातीपातीची समीकरणे खोडून काढली आहेत. शहरी मतदारांचा प्रभाव या मतदारसंघात दिसून येतो. ग्रामीण भागाचे राजकारण संपुष्टात आल्याने सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा समन्वय साधणाऱ्या उमेदवारासाठी हा मतदारसंघ अधिक सोयीचा ठरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण चेहºयाच्या उमेदवारांना त्यांची अनामत राखता आली नाही. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी नुकतेच शिवसेनेत पक्षांतर केले आहे. सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिण या दोन्ही मतदारसंघात त्यांची चाचपणी सुरू आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याशी सहकारमंत्र्यांचा अंतर्गत संघर्ष असल्याने त्यांना शह देण्याची संधी पालकमंत्री सोडत नाहीत. यावेळी श्रीशैल हत्तुरे भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून तुल्यबळ उमेदवार देता आला नाही तर तिसºया आघाडीला बळ देण्याचा प्रयत्न काँग्रेसचे असंतुष्ट नेते करीत आहेत.

मतदारसंघात विकासाच्या अनेक योजना आणून आपल्या राजकारणाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न सुभाष देशमुख यांनी केला आहे. संपर्कातही ते आघाडीवर आहेत.पाच वर्षांत काय घडले?

  • मुख्यमंत्री सडक योजनेतून मोठा निधी मिळून रस्त्यांची कामे मार्गी लागली. ग्रामीण आणि सोलापूर शहर हद्दवाढ भागात पक्के रस्ते झाले.
  • मंद्रुप येथील सीतामाई तलावात उजनीतून पाणी आणण्याची योजना मंजूर करून त्यासाठी निधीची तरतूद. या योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे
  • ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंद्रुप येथे एमआयडीसी मंजूर. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
  • सुभाष देशमुख यांनी स्थापन केलेल्या ‘लोकमंगल’वर दूध भुकटीप्रकरणी गुन्हा दाखल
  • मतदारसंघातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब शेळके यांच्या तिसºया आघाडीसोबत बैठका सुरू

 

मुख्यमंत्र्यांनी मला सढळ हाताने निधी दिल्याने या मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न केला आहे. अनेक प्रलंबित प्रश्न हाती घेतले आणि ते तडीस नेले आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, सिंचनाच्या कामावर मतदार योग्य निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. - सुभाष देशमुख , सहकारमंत्री

टॅग्स :solapur-city-central-acसोलापूर सिटी सेंटरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Subhash Deshmukhसुभाष देशमुख