पंढरपूर : रांझणी (ता. पंढरपूर) येथील गारवा हॉटेलवर चालणारा जुगार अड्ड्यावर तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी सोमवारी छापा टाकला. यानंतर २२ जणांना विरुध्द पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर हे कोरोना या संसर्गजन्य रोगा विरुद्ध उपाययोजना करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील रांजणी, अंबे, चळे यासह अन्य गावाच्या भेट दौऱ्यावर गेले होते. त्यांना यादरम्यान रांजणी येथील गारवा हॉटेल मध्ये काही हालचाली दिसून आल्या. त्यांनी हॉटेलमध्ये भेट दिल्यास त्या ठिकाणी बावीस जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. यानंतर बेल्हेकर यांनी पोलिसांना त्या ठिकाणी बोलावून घेतले.या प्रकरणी संजय गोविंद भातलावंडे (पंढरपूर), दत्तात्रय महादेव घोडके ( रा. आनवली), पांडुरंग रामचंद्र गायकवाड, बंडू महादेव पाटील (रा. ओझेवाडी), राजू इनाम मनेरी (रा. मगरवाडी), जावेद विलास मुजावर (रा. चळे), आप्पा सिद्राम पाटील ( रा. घोडे श्वर), आप्पा विश्वास वाघमोडे ( रा. चळे), दामोदर धोंडीबा सावंत ( रा. आंबे), दत्तात्रेय लहू चौगुले ( रा. रांजणी), समाधान गंगाधर माने घोडेश्र्वर), सुरेश श्रीरंग गांजाळे ( रा.अनवली), दत्तात्रेय शिंदे ( रा. आंबे), भास्कर विष्णू नवले (रा. आंबे), धनाजी आउदुंबर लाडके ( रा. मुंडेवाडी), दत्तात्रेय शहाजी गायकवाड ( रा. ओझेवाडी), सुभाष रामचंद्र जगताप ( रा. मंगळवेढा) श्याम शिंदे ( रा. आंबे), संभाजी शिवाजी गवळी (रा. मंगळवेढा), पंडू माणिक प्रक्षाळे ( रा. चळे), दिलीप औदुंबर जाधव ( रा. ओझेवाडी), सुभाष रघुनाथ कडूबरणे ( रा. माचणूर, ता. मंगळवेढा) विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.