शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
2
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
3
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?
4
विराट पुन्हा होणार RCBचा कर्णधार, बंगळुरूचा संघ 'या' ६ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा
5
"सलमान खान लॉरेंस बिश्नोईपेक्षाही वाईट!", सोमी अली म्हणाली - त्याने ऐश्वर्याचे हाड मोडले होते...
6
मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना ‘काँटे की टक्कर’, ११ मतदारसंघांमध्ये थेट सामना, उमेदवारांचा कस लागणार
7
काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज
8
Stock Market Updates: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Cipla मध्ये मोठी तेजी
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
10
Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या
11
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
12
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
13
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
14
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
15
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
16
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
17
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
18
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
19
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
20
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

बेपत्ता झालेल्या १३४ महिला अन्‌ १३ बालकांचा शोध; ऑपरेशन मुस्कान मोहीम फत्ते

By विलास जळकोटकर | Published: December 09, 2023 6:27 PM

पथक स्वगृही परतले

विलास जळकोटकर, सोलापूर : शहरातून गेल्या महिनाभरात बेपत्ता झालेल्या तब्बल १३४ महिला, तरुणी आणि ७ बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या स्वगृही पोहचवण्याची किमया विशेष बाल पोलीस पथकाने केली. त्यानुसार या पथकाने राबवलेली ‘मुस्कान ऑपरेशन’ ही मोहीम फत्ते केली. प्रदीर्घ कालावधीनंतर आपली प्रिय व्यक्ती घरी परतल्याने कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. 

गत महिन्यातील १ ते ३० नोव्हेंबर महिन्यात शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून लहान मुले, १८ वयोगटाच्या पुढील तरुणी, महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले होते. तशा तक्रारीही ठाण्यामध्ये नोंदलेल्या होत्या. शिवाय काही बालकांचेही अपहरण झाले होते. या बेपत्ता होण्याच्या प्रकाराचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सर्व पोलीस ठाणे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वतीने आठ पथकांद्वारे ही मोहीम राबवण्यात आली.‘ आपरेशन मुस्कान’ असे या मोहिमेला नाव देण्यात आले होते. 

‘ऑपरेशन मुस्कान’ १२ मोहिमेअंतर्गत १८ वर्षावरील बेपत्ता महिला, तरुणींची विशेष शोध मोहीम राबवण्यात आली. यामध्ये १३४ महिला व त्यांच्यासोबत हरवलेल्या ७ बालकांचा शोध घेऊन कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे त्या कुटुंबातील पालकांनी आनंद व्यक्त करुन पोलिसांचे आभार मानले. 

दोन पडितांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हाअनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून १७ नोव्हेंबर रोजी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५,६ भादंवि सह कलम ३७० (अ)(२)  प्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोन पिडित महिलेची सुटका करुन दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

लैंगिक शिक्षणावर १२ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘मस्कान ऑपरेशन १२ दरम्यान सोलापूर शहर हद्दीतील शाळांमध्ये जाऊन इयत्ता ५ वी ते १२ वी च्या वर्गातील १२०० विद्यार्थी -विद्यार्थिनींना बालकांच्या  लैंगिक अपराधासंबंधी बाल कामगार अधिनियम १९८६ नुसार व हरवलेल्या बालकांचा शोध यासंबंधी व्याख्यान देऊन जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी