सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सांगोल्यातून मंगळवार व गुरुवार या दोन दिवशी किसान रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल, सोलापूर रेल्वे मंडल समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून, रेल्वे मंत्रालयाने सांगोला ते आदर्शनगर (दिल्ली) ही दुसरी रेल्वे सुरू केली आहे.
सांगोला रेल्वेस्थानकातून मंगळवार व गुरुवार या दोन दिवशी आदर्शनगरसाठी (दिल्ली) किसान रेल्वे सुरू झाल्याने सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळे व शेतीमाल दिल्लीच्या बाजारपेठेत पाठवणे सुलभ झाले आहे.
कोट :::::::::::::::
आठवड्यातून दोन दिवस सुरू झालेल्या सांगोला-आदर्शनगर (दिल्ली) या किसान रेल्वेचा लाभ सांगोला तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त शेतीमालाला स्वस्त, सुलभ, वेगवान वाहतुकीद्वारे दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
- चेतनसिंह केदार सावंत
तालुकाध्यक्ष, भाजप