सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेगाने प्रादुर्भाव सुरू आहे. सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य पार पाडत आहेत तरीही बहुतांशी लोक, तरुण कोरोनाच्या संसर्गाला गांभीर्याने न घेता शासनाच्या आदेशाचा भंग करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी तोंडाला मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणे अशा ३१५६ केसेस करून १३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनधारकांकडून १० हजार, व्यापाऱ्यांनी निर्धारित वेळेत दुकान बंद न केल्याने ५३ केसेस करून २८ हजार ५०० रुपयांचा दंड तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ५८ दुचाकी जप्त केल्या. शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ परमिट रूम व १ देशी दारू दुकानदारावर गुन्हा दाखल करून सील केले.
कोरोनाचे नियम मोडणाऱ्या ९ जणांवर गुन्हे दाखल करून अटक तर ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त लोक जमवून लग्नकार्यात मिळून आल्याने १० जणांवर गुन्हे दाखल करून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोट :::::::::::::::::::
शहर व तालुक्यात कोणीही व्यक्ती विनाकारण फिरताना मिळून आल्यास व त्याच्याकडे कोविड चाचणी प्रमाणपत्र नसेल तर त्याची त्याचठिकाणी कोविड चाचणी केली जाईल. चाचणीत तो पॉझिटिव्ह मिळून आल्यास त्याची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी केली जाईल.
- भगवानराव निंबाळकर
पोलीस निरीक्षक, सांगोला