सोलापूर जिल्ह्यातील ६७८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. परंतु शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढत असल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागात कडक निर्बंध घातले होते. यामुळे सध्या ग्रामीण भागातील कोरोना पाॅझिटव्ह रुग्णसंख्येत घट झाली. अनेक गावे कोरोनामुक्त झाली. गावागावामध्ये दिवसेंदिवस नऊ ते दहा रुग्ण आढळून येत होते.
कडक निर्बंध घालून व गावबंद केल्यामुळे मे महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा अवघा एक झाला होता. मात्र ऑनलाॅक केल्यामुळे सुस्ते परिसरात कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून विवाह सोहळे, इतर घरगुती कार्य सुरू झाल्यामुळे नागरिकांची गर्दी, बेजबाबदारपणे दारू पिऊन फिरणाऱ्या तळीरामामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढला आहे. सध्याच्या स्थितीला सुस्ते येथे कोरोनाचे २४ रुग्ण असल्याची माहिती डाॅ. अमित रोकडे यांनी दिली.