सोलापूर : रेल्वे प्रवाशांचे मोबाईल पळवणाºया एका संशयीत चोरट्याला लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने पकडले आहे़ त्याच्याकडून १ लाख ९,५०० रुपयांचे ११ हँडसेट जप्त केले आहेत.
राजू मंच्छिद्र जाधव (वय २५, रा़ सेटलमेंट फ्री कॉलनी नं ६, सोलापूर) असे पकडण्यात आलेल्या संशयीताचे नाव असून त्याला गुरुवारी मोबाईल हँडसेटसह ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून संशयीत राजू जाधव हा रेल्वे डब्यांमधून इतर प्रवाशांबरोबर प्रवास करता-करता गर्दीचा फायदा घेवून त्यांचे मोबाईल लांबवायचा़ याची कुणकुण लोहमार्ग पोलिसांना लागली होती़ त्यांचे एक पथक त्याच्या मागावर होते़ गुरुवारी रेल्वे स्थानकावरच सापळा रचून त्याला पकडले. त्याच्या घराचीही झडती घेतली गेली़ मात्र त्याने घरामध्ये चोरीचे काही लपवून ठेवल्याचे उघडकीस आलेले नाही़ इतर गुन्हे उघडकीस यावेत आणि पोलीस कोठडी मिळावी यासाठी त्याला शुक्रवारी सोलापूर येथील दौंडच्या फिरत्या न्यायालाल हजर केले होते़.
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कामगिरी केली या कामगिरीचे पोलीस अधीक्षक दीपक साकोरे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले-पाटील यांनी सोलापूरच्या पथकाच्या कामगिरीचे कौतूक केले़ या कामगिरीत पोलीस हवालदार संजय जाधव, विश्वास वळकुटे, प्रकाश कांबळे, पोलीस नायक देवानंद बडदाळे, पोलीस शिपाई हनुमंत बोराटे, अशोक कचरे, सुनील कोळी यांनी सहभाग नोंदवला़