सोलापूर : शहरातील कुष्ठरोग वसाहतीतील दवाखान्यात असलेल्या मतदान केंद्रात कोणत्याच सुविधा नसल्याने कर्मचारी हैराण झाले. कर्मचाºयांच्या मदतीतीला परिसरातील नागरिक धावून आल्याने वीज व पाण्याची सोय झाली.
कुमठानाका येथील कुष्ठरोग वसाहतीतील दवाखान्यातील मतदान केंद्रात दोन बुथ (बुथ क्र. २४२ व २४३ ठेवण्यात आले आहेत. बुधवारी या केंद्रासाठी मतदान केंद्राध्यक्षासह कर्मचारी दाखल झाले पण या ठिकाणी असलेल्या दोन आठ बाय दहाच्या खोलीत काहीच सुविधा उपलब्ध नसल्याने पाहून ते हैराण झाले.
ना वीज व ना पाणी रात्र कशी काढायची असा त्यांच्यासमोर प्रश्न उभा ठाकला. त्यांच्या मदतीला लेप्रेसी मदत संस्थेचे अध्यक्ष अंबादास नडगिरी धावून आले. त्यांनी महापालिकेच्या अधिकाºयांशी संपर्क साधून वीजेची सोय केली. तसेच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. सकाळी उठल्यावर कर्मचाºयांना स्नानासाठी पाणी उपलब्ध झाले नाही. स्वच्छतागृह नसल्याने महिला कर्मचाºयांची कुचंबणा झाली.
दोन्ही बुथ आठ बाय दहाच्या खोलीत कसेबसे मांडण्यात आले. टेबलाला टेबल खेटून कर्मचारी दाटीने बसले. मतदान कक्षालाही पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही. विशेष म्हणजे कुष्ठरोगी बांधवांचे १0५0 इतके मतदान असताना ना व्हीलचेअर, ना वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या गेल्या. कुष्ठरोगी मतदानांसाठी खबरदारी म्हणून मतदान कर्मचाºयांना हॅन्डग्लोज पुरविण्यात येतात. पण यावेळेस अशी कोणतीच खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आले. या मतदान केंद्रावर सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आमदार प्रणिती शिंदे यांनी दोनवेळा या मतदान केंद्रास भेट दिली. ----------असे केंद्र पाहिले नाहीमतदान केंद्र अधिकारी मुक्तेश्वर मुळे म्हणाले मी ३0 वर्षे मतदान कें्रदाची सेवा केली पण आयुष्यात असले केंद्र पाहिले नाही. या मतदान केंद्रावर ना वीज, ना पाण्याची सोय आहे. स्वच्छतागृह नाही, दिव्यांगांना सुविधा नाही. तक्रार नोंदविल्यावर रात्री उशिरा वीज कनेक्शन मिळाले, निम्म्या कर्मचाºयांनी आंघोळ केली नाही. सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली ही वस्तुस्थिती आहे.