सोमनाथचे आई-वडील मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात. वडलांना एक बहीण, एक भाऊ असून त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. आठवडाभरात मिळालेल्या रोजगारामधून निम्मे पैसे ‘सोमनाथ’च्या शिक्षणासाठी बाजूला ठेवत असत.
सोमनाथचे प्राथमिक शिक्षण सरकोली येथील झेडपी शाळेत झाले. सोमनाथ याने बारावीमध्ये ८१ टक्के गुण मिळवून पुढील शिक्षणासाठी मुंबईमध्ये बी-टेकचे शिक्षण पूर्ण केले. दिल्लीमध्ये झालेल्या गेट परीक्षेत ९१६ क्रमांकाने त्याची आयटीआयसाठी मेकॅनिकल डिझायनर म्हणून निवड झाली. मेकॅनिकल डिझायनरची नोकरी करत असताना यूपीएससीचा अभ्यास केला. यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत अपयश आले. त्यानंतर इन्फोसिसमध्ये नोकरी केली. सन २०१९ मध्ये एम-टेकसाठी अर्ज केला होता. तसेच नोकरी करत असताना १३ एप्रिल २०१९ मध्ये तोंडी परीक्षा झाल्यानंतर २ जून २०२१ ला इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याचा त्याला ई-मेल आला आहे.
यामुळे सोमनाथ माळी यांचा झेडपी शाळेतील मुख्याध्यापक बंडगर यांनी सत्कार केला. यावेळी एकमल्ली, भोई, माजी सरपंच भास्कर भोसले, सुधीर कराळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ::::::::::::::::
सोमनाथ माळी