सोलापूर - ज्येष्ठ विचारवंत, चिंतनशील लेखक प्रा. फकरूद्दिन तथा एफ. एच. बेन्नूर (वय -८०) यांचे शुक्रवारी रात्री नऊ वाजता मूत्रपिंडाच्या विकाराने बेन्नूरनगर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता मोदी कब्रस्थानमध्ये दफन होणार आहेत.प्रा. बेन्नूर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३८ रोजी सातारा येथे झाला. १९६६ ते १९९८ पर्यंत त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. कर्नाटक विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी हिंदू - मुस्लीम प्रश्न, मुस्लीम राजकारण, सामाजिक सौहार्द, महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विषयांवर १५० हून अधिक शोधनिबंध सादर केले होते. डॉ. आंबेडकर अकादमीची स्थापना केली होती. सन २०१४ मध्ये त्यांनी इतिहास पुनर्लेखन समितीची स्थापना केली.
सत्कार समारंभ राहून गेला!गाजीउद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने २० आॅगस्ट रोजी प्रा. बेन्नूर यांचा मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात येणार होता. यावेळी त्यांच्या ‘मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्टÑवाद’, ‘भारतीय मुस्लीम विचारक’ यासह तीन पुस्तकांच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन होणार होते; आता हा सोहळा होणार नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे.प्रा.बेन्नूर यांच्या साहित्यकृतीभारतीय मुसलमानोंकी मानसिकता और सामाजिक संरचना (१९९८)हिंदुत्त्व, मुस्लीम आणि वास्तव (२००७)गुलमोहर (कविता संग्रह २०१०)सुफी संप्रदाय : वाङमय, विचार आणि कार्य (२०१६)भारत के मुस्लीम विचारक (२०१८)हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ (२०१८)मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्टÑवाद (२०१८)भारत के मुसलमानो की मशिअत और जेहनियत (उर्दू २०१८)मुस्लीम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेपभारतीय मुस्लीम अपेक्षा आणि वास्तव