शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

ज्येष्ठांनो, तुम्ही आधारस्तंभ आहात.. कोरोना काळात आनंदी राहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:27 AM

कलेक्टर लिहितात ‘लोकमत’साठी; जाणून घ्या जिल्हाधिकाºयांनी काय सांगितले सोलापूरकरांसाठी...!

ठळक मुद्देअनेक रुग्ण हे अगदी उशिरा उपचारासाठी येतात आणि मग उपचारास शरीर साथ देत नाहीआपण आपली तर काळजी घ्याच, त्याचबरोबर घरातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्याआपण सारे मिळून या कोरोनावर निश्चित मात करू..

सोलापूर शहरातील माझ्या ज्येष्ठ वाडवडील, बंधू-भगिनी गेले काही दिवस आपण सारे जण कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आपल्यापैकी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी गेल्या ६० दिवसांपेक्षा अधिक काळ घरामध्ये थांबून शासनाला एकप्रकारे सहकार्य केले आहे. आपलं आरोग्यही जपण्याचा प्रयत्न केला आहे. मी जिल्हाधिकारी या नात्याने आपल्या सर्वांचा शतश: आभारी आहे. आपण अशीच काळजी घ्या. आपल्या समवयस्क इतरांच्याही संपर्कात राहा. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क ठेवा. एकमेकांना सल्ला द्या. आपण रोज घरात जितका जमेल तितका व्यायाम करा, विश्रांती घ्या, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहा, आपल्या आवडीची गाणी ऐका, आपल्या नातेवाईकांशी फोनवर बोला, स्वत: घराबाहेर पडण्याचे टाळाच. 

आपल्याला अगदीच एकटेपणा आणि इतर कोणताही त्रास असेल तर नजीकच्या लोकप्रतिनिधींशी / पोलिसांशी संपर्क साधा. स्वत:चं मन आनंदी ठेवा, दु:ख, भीतीला कवटाळून बसू नका. आपण घरातील अडगळ नाही, तर आधारस्तंभ आहोत, आशीर्वाद देणारे आहोत, आपल्या भावी पिढीचे आपण मार्गदर्शक आहोत, याची जाणीव ठेवा. या आजारावर आपण निश्चित मात करू. आपण सारे ज्येष्ठ नागरिक, अनुभवी आहोत. संकटाशी मुकाबला करण्याचा अनुभव माझ्यापेक्षाही आपला अधिक आहे. 

इतके दिवस आपण साथ दिली, अशीच साथ पुढे द्या. आपण किंवा आपले समवयस्क कोणी आजारी आहेत, त्रास होतो आहे तर त्वरित वैद्यकीय यंत्रणांना माहिती पोहोचवा. शासन सदैव आपल्या आरोग्याच्या काळजीत आहे. यंत्रणा मदतीला सज्ज आहे. आपण सारे ज्येष्ठ नागरिक माझ्या या आवाहनाला प्रतिसाद देणार, याबाबत माझ्या मनात शंका नाही. 

 कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेले काही दिवस लॉकडाऊन, संचारबंदी यांचा आपण वापर केला. निश्चितपणे याचाही उपयोग झाला आहे. आपण सदासर्वकाळ सर्व कामे थांबवून घरात राहून चालणार नाही. या आजाराशी लढा देत असताना काही नियम पाळून जर आपण पुढे आलो तर निश्चितपणे शासनही सहकार्य करण्यास तयार आहे. हे करत असताना शासनाने दिलेले सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करा.आपण केवळ आपलीच काळजी घ्यावी असं नाही, तर इतरांची काळजीही घेण्याचा प्रयत्न करा. विशेषत: घरातील लहान मुलं व त्याहीपेक्षा आपले वाडवडील, ज्येष्ठ नागरिक यांचा गेल्या काही दिवसांत सोलापुरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात मुख्यत: ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. यातील अनेक जणांना पूर्वीचे आजार आहेत. पण तरी देखील त्यांचा मृत्यू होणे हे क्लेशदायक आहे. शासनाने याही मुद्याची खबरदारी घेत अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. 

अजूनही अनेक ठिकाणी लोक स्वत:हून माहिती देण्यास पुढे येत नाहीत. आजार अंगावर काढत आहेत. विनाकारण अलगीकरणासाठी जावे लागेल किंवा समाज काय म्हणेल या भीतीत काही लोक आहेत. कृपया घाबरू नका. शासन आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. आपण फक्त एवढेच करा, एक पाऊल पुढे या. आपली व्यथा, आपला आजार, तपासणीसाठी येणाºया यंत्रणेला स्वत:हून सांगा. कुणी आलं नसेल तर आपल्या जवळच्या लोकप्रतिनिधींना, शासकीय यंत्रणेतील कर्मचाºयांना किंवा अत्यावश्यक सेवांच्या दूरध्वनीवर संपर्क साधून कळवा. यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू.

अनेक रुग्ण हे अगदी उशिरा उपचारासाठी येतात आणि मग उपचारास शरीर साथ देत नाही. उशीर झालेला असतो, हे लक्षात येतं. माझे आपल्या सर्वांना कळकळीचे, मनापासून आवाहन आहे, आपण आपली तर काळजी घ्याच, त्याचबरोबर घरातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या. आपण सारे मिळून या कोरोनावर निश्चित मात करू..

ज्येष्ठांचे आशीर्वाद, मार्गदर्शन हवंय..

  • - ज्येष्ठ नागरिकांचं वय लक्षात घेऊन त्यांच्या मुलांनी, इतर नातेवाईकांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा-संवाद सुरू ठेवावा. त्यांच्या नित्य नियमित अडीअडचणीमध्ये दखल घ्यावी. प्रत्येकाने किमान एका ज्येष्ठ नागरिकाची काळजी घेतली तरी देखील बºयाच जणांची समस्या कमी होईल. विनाकारण घाबरून जाऊ नका आणि ज्येष्ठ घाबरतील, असा संवादही करू नका. आपल्या सर्वांना ज्येष्ठांचे आशीर्वाद, मार्गदर्शन हवे आहे. त्यांच्या या उतारवयात त्यांची काळजी घेण्याचं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. 
  • - येष्ठ नागरिक म्हणजे घरातील अडगळ नव्हे तर एक मोठं आदराचं स्थान आहे. त्यांच्याशी बोलत राहा. घरातच नियमित शक्य तितका व्यायाम करा, करून घ्या. मन आनंदी राहील, याची काळजी घ्या. या सर्व स्थितीत आपण एकच बोध घेतला आहे, जीवनात जीवापेक्षा काही महत्त्वाचे नाही. ज्येष्ठ नागरिक आजार अंगावर काढणार नाहीत, याची काळजी घ्या. 
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय