सध्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असल्याने भारत संचार निगमच्या ऑप्टिकल फायबर केबल वारंवार खराब होत असल्याने दस्तनोंदणी बिन भरवशाची राहिली आहेत. यामुळेच नागरिकांकडून झालेले व्यवहार रखडून पडले आहेत, तर बीएसएनएलकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने दुरुस्तीसाठी बार्शीहून कर्मचारी बोलवावे लागतात. हे काम पूर्ण होईपर्यंत शासकीय दस्त नोंदणीचे काम ठप्प राहत असल्याचे प्रकार दररोज घडत आहेत.
कोरोनामुळे खरेदी- विक्रीला चालना मिळावी व महसुलात वाढ व्हावी यासाठी राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात आली होती. त्यामुळे मार्च महिना संपेपर्यंत संबंधित व्यवहाराचे मुद्रांक शुल्क भरल्यानंतर पुढील कालावधीत शुल्कात वाढ झाल्यास जादा शुल्क भरावे लागणार नसल्याचेही दुय्यम निबंधक ए. एस. चव्हाण यांनी सांगितले.
कोट
दूरसंचार विभागाची सेवा सुरळीत नसल्याने दस्त नोंदणीसाठी वारंवार अडथळा येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शासकीय दस्त नोंदणीची वेळ दीड ते दोन तास मुदत वाढवून दररोज ४० ते ५० दस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. शासकीय वेळेपेक्षा जास्त वेळ काम करीत आहोत.
- ए. एस. चव्हाण, दुय्यम निबंधक, माढा.
ऑनलाइन दस्त नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येऊन खरेदी- विक्री व गहाणखत यासह इतर कामांना टोकण पद्धत राबविण्यात यावी जेणेकरून नागरिकांचा त्रास व वेळ वाचणार आहे.
-
-कल्याण बाबर, मुद्रांक विक्रेते संघटना अध्यक्ष, माढा तालुका.
फोटो ओळी : १२माढा
माढ्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात झालेली गर्दी.