बार्शी शहरालगत असलेल्या जामगाव आ. गावाजवळून एका वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त जनावरे घालून उस्मानाबाद कत्तलखाण्याकडे घेऊन जात असताना प्राणिमित्र धनयकुमार पटवा याच्या मदतीने तालुका पोलिसांनी छापा टाकला. त्यात १ लाख ७५ हजारांची ७ जनावरे व ३ लाखाचे वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी याबाबत कलीम रफिक कुरेशी, अफताब अकबर कुरेशी (दोघे रा. पापनस ता. माढा) याना व वाहनासह तीन जर्सी गायी, १ कालवड, २ खिलारी गायी अशी ७ जनावरे व वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत धनराज फत्तेपुरे (वय ३०) यांनी तालुका पोलिसात त्यांच्या विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार व महाराष्ट्र पशुसंरक्षण कलम ११, ५ अ, ५ब ,६ व ९ प्रमाणे गुन्हा नोंदला आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते व प्राणिमित्र धनयकुमार पटवा यांना ही जनावरे पापनस येथून नेहमीचेच आरोपी उस्मानाबाद शहर येथील कत्तलखान्यात कापण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळल्याने त्यांनी सपोनि शिवाजी जायपत्रे याना भेटून सांगितले. त्यांनी तातडीने फौजदार सूर्यवंशी व इतर पोलिसानी जाऊन कारवाई केली. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.
--
जनावरांच्या मुसक्या बांधून वाहतूक
वाहनामध्ये जनावरांच्या मुसक्या बांधून क्षमतेपेक्षा जास्त जनावरे कमी रुंदीच्या जागेत बांधलेली दिसली. त्यांना ताब्यात घेऊन मालकाचे नाव विचारताच दोघांनी कलीम रफिक कुरेशी असून, ही जनावरे उस्मानाबादच्या कत्तलखाण्याकडे जात असल्याचे अफताब कुरेशी यांनी सांगितले.
----