सोलापूर : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन व होम अप्लायन्सेस वस्तूंचे भव्य प्रदर्शन 'इलेक्ट्रो २०२१' चे आयोजन केले गेले आहे. दि. २५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत यंदा हे प्रदर्शन शहरातील विविध भागातील सदस्यांच्या शोरुममध्येच आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष ईश्वर मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदा नटराज आटा चक्की हे मुख्य प्रायोजक असून बजाज फिनसर्व हे कंझ्युमर फायनान्स असोसिएट आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवार २५ मार्च रोजी सकाळी ११.०० वा. फ्लोरा अप्लायन्सेसचे मॅनेजींग डायरेक्टर देवांग पाठक यांच्या शुभहस्ते झुमद्वारे संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रोचे चेअरमन शिवप्रकाश चव्हाण यांनी सांगितले. हा कार्यक्रम वेब कास्टद्वारे प्रसारण करण्यात येणार आहे
७ दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो २०२१ या प्रदर्शनाचे हे २२ वे वर्ष आहे. या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलसीडी, एलईडी, कलर टिव्ही, फ्रिज, साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टिव्ही, मायक्रोव्हेव ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, एअर कंडीशनर, सोलर सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आय पॅड, टेलीफोन, हेल्थ इक्वीपमेंट, मिक्सर, फुड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरीफायर,किचन चिमणी, स्टॅबीलायझर, कॉम्प्युटर, कॉम्प्युटरला लागणारी उपकरणे इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच फायनान्सच्या माध्यमातून शुन्य टक्के 0% व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाणार आहे.
सेडा तर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो २०२० ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. परंतु यंदा कोराेनाच्या प्रादुर्भावच्या पार्श्वभुमीवर वेगळ्या प्रकारे आयोजन होत आहे. यामध्ये सेडाचे सहभागी सेडा सदस्यत्यांच्याकडे असलेली विविध कंपन्यांची, विविध आकाराची , अनेक रंगसंगतीची इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्सेस, कॉम्प्युटर्स, टेली कम्युनिकेशन यांची आकर्षक मांडणी करतील. या प्रदर्शनस्थळी काळात इलेक्ट्रो २०२१ मध्ये ग्राहकांसाठी विविध स्कीम्स्, डिस्काऊंट, बक्षिसे देण्यात येतील. सब से सस्ते सात दिन ही योजना सभासदांनी राबविण्याचे ठरवले आहे. या पत्रकार परिषदेस सेडाचे खजिनदार भुषण भुतडा, सह माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, खुशाल देढिया, संचालक विजय टेके, गिरीष मुंदडा आदी उपस्थित होते.
--------------
ग्राहकांना बक्षीस जिंकण्याची संधी
या प्रदर्शनादरम्यान खरेदी केलेल्या वस्तुंवर ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे सुमारे १.७१ लाखापर्यंतची बक्षिसेही देण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या संयोजनासाठी सेडाद्वारे विशेष समिती कार्यरत आहे. प्रदर्शनासाठी सर्व सहभागी सदस्यांनी आपल्या शोरुममध्येच इलेक्ट्रोकरिता वेगळे काऊंटर ची व्यवस्था करणार आहे. कोव्हीड प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर मास्क ,हँड वॉश, सोश्यल डिस्टन्सिंग आदी नियमावलीची काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.
-----------
ग्राहकांच्या सेवेसाठी क्युआरकोड
ग्राहकांच्या सेवेसाठी क्युआरकोड द्वारे शहरातील सहभागी दुकानदारांची माहिती, त्यांचे ऑफर्स, अपटडेटस् आदींची माहिती घरबसल्या मिळण्याची सोय करण्यात आली आहे. सहभागी शोरुमध्ये सर्वोत्कृष्ठ सजावट करणाऱ्या शोरुमला बक्षिस ही देण्यात येणार आहे.
----------
सेडाचे सामाजिक उपक्रम
सेडातर्फे अनेक सामाजिक उपक्रम ही राबविण्यात येत असून त्यामध्ये सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व आर्थिक मदतही करण्यात येते. कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृध्दीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येतात. कोरोनाच्या काळात सेडा तर्फे सर्वोपचार रुग्णालयास ७ लाख किंमतीचे वैद्यकिय यंत्रणा तसेच गरजुंना फुड पॅकेटस्चे वाटपही करण्यात आली होती.