वैराग : वैराग भागातील २२ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायती राऊत गटाच्या ताब्यात आल्या. चार ग्रामपंचायती सोपल गटाला मिळाल्या, तर सोपल राऊत गटाच्या युतीला ५ ग्रामपंचायत मिळाल्या. यापूर्वी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. वैराग भागमध्ये राऊत गटाला उल्लेखनीय यश मिळवण्यात सभापती अनिल डिसले यांचे योगदान आहे. बहुतेक ठिकाणी सोपल गटामध्ये बंडखोरी झाल्याने अनेक ठिकाणी प्रस्थापितांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्या गावांमध्ये युवकांच्या मतदानाचा टक्का वाढला आहे त्या बहुतांश गावात सत्तांतर होऊन प्रस्थापितांना धक्का बसला आहे.
भालगाव, सारोळे, भातंबरे, झरेगाव, घाणेगाव, आंबेगाव, निंबळक येथे राऊत गटाचे वर्चस्व राहिले आहे. भालगाव व निंबळक वगळता राऊत गटाने पाच ग्रामपंचायती नव्याने स्वत:डे खेचून आणल्या आहेत. शेळगाव, धामणगाव, तडवळे, ढोराळे या चार ग्रामपंचायती सोपल गटाकडे आहेत. फक्त शेळगाव ग्रामपंचायत खेचून आणण्यात यश आले. तसेच यावली, सासुरे, पिंपरी, तुळशीदासनगर, मानेगाव या गावांमध्ये सोपल व राऊत गट यांच्यात युती झाली होती. पाच ग्रामपंचायतींवर दोघांचाही अंकुश राहणार आहे. याचबरोबर मालवंडी, सर्जापूर, रातंजन, मुंगशी, जामगाव, हळदुगे, पिंपळगाव या ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. यामध्येही राऊत गटाचेच बहुतांश वर्चस्व आहे.
---
फोटो : १८ वैराग सासुरे
ग्रामपंचायतीतील निवडणुकीतील विजयानंतर जल्लोष करताना सासुरे ग्रामस्थ.