शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कर्नाटक एक्सप्रेसमधील सहा प्रवाशांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:41 IST

गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा झाला प्रयत्न, दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर, कुर्डूवाडी उपचार सुरू

ठळक मुद्देकर्नाटक एक्सप्रेसमधील सहा प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रयत्नदोघां प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आलीसर्वच प्रवासी अजूनही गुंगीतच असल्याने किती ऐवज लंपास झाला याविषयीची माहिती अद्याप मिळू शकली नाही

कुर्डूवाडी/ सोलापूर  :  कर्नाटक एक्सप्रेसमधील सहा प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. यातील दोघां प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. यातील सर्वच प्रवासी अजूनही गुंगीतच असल्याने किती ऐवज लंपास झाला याविषयीची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

दरम्यान, शशीकपूर, वय ५० रा.देहू रोड पुणे, मोहम्मद शाहीद मोहम्मद वय ५३ रा.मुजफफरपूर बिहार, थाना कटारा, पोस्ट परसील, मोहम्मद रउफ (वय ४० रा गौंडा जि.बालमपूर), अक्षय पांडे (वय २३ रा.संगमविहार दिल्ली),  मोहम्मद साहील आलम (वय २५ रा. परसोल कटरा जि.मुजफफरपूर), मुस्ताक अहेमद अलीमुददीन खान (रा.मोईरंग विष्णूपूर मणिपूर ) अशी विषबाधा झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, बेंगलोर-दिल्ली कर्नाटक एक्सप्रेसमधील जनरल डब्यातून प्रवासी प्रवास करीत होते.  या दरम्यान हिंदूपूरा स्टेशन येण्यापूर्वी कोणीतरी ‘माझा’ हे थंड पेय प्लास्टीकच्या ग्लासामधून या ६ जणांना दिले, त्यानंतर त्यांना गुंगी आली व ते झोपी गेल्याचे मोहम्मद आलम या शुध्दीवर आलेल्या प्रवाशाने सांगितले. याबाबत एक्सप्रेसमधील प्रवाशांना विषबाधा झाली असल्याचा रेल्वे आरपीएफ कंट्रोलहून कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यात संदेश आला.  त्यानुसार रेल्वे आरपीएफचे थाना प्रभारी पोलीस निरीक्षक नेटके, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दरेकर व आकाश वीटे हे आपल्या कर्मचा-यासह कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर हजर झाले़, त्यांनी गाडीच्या प्रत्येक डब्यात पेशंट - पेशंट अशी हाक मारली. यावेळी जनरल डब्यातील प्रवाशांनी ६ सहप्रवासी असल्याची माहिती दिली. या प्रवासी पेशंटना रेल्वेतून पोलीस व आरपीएफ जवानांनी उचलून खाली घेतले.

या दरम्यान स्थानकावर आलेले रेल्वे हॉस्पीटलच्या मंडल महा चिकीत्सक अधिकारी डॉ.शहीदा शेख व त्यांच्या स्टाफने तपासणी करुन कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशीकांत त्रिंबके व स्टाफने सर्वांवर प्राथमिक उपचार केले.  

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेpassengerप्रवासीhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य