आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : सोलापूर हैद्राबाद महामार्गावर ट्रक अडवुन पैसे लुटणाºया चार जिल्ह्यातील सात दरोडेखोरांना सोलापूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. कादीर अहमद शफीउल्ला खान (वय ४५,रा.मुंब्रा.जि. ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २ आॅगस्ट रोजी खान हे बारामती येथील डायना मिल्क कंपनीतुन खाद्य पदार्थ भरुन (एमएच ४५ एआर ५४५२ )या क्रमांकाच्या ट्रक मधुन घेवुन जात होते. सोलापूर हैद्राबाद रोडवर तांदुळवाडी शिवारात अज्ञात दरोडे खोरांनी ट्रक थांबवुन फिर्यादीस मारहाण करुन त्यांच्याकडी ४५ हजार रुपयांची रोकड व दोन मोबाईल असा एकुण ५२ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सुरज नवनाथ मुंडे (वय २०,रा. उपळाई.ता.कळंब), किशोर सुनिल भोई (वय २४,रा.कळाशी.ता.इंदापूर ), रोहित नवनाथ शिंदे (वय १९,रा.कळाशी.ता.इंदापूर ), योगेश रामलींग ढाकणे (वय २०,रा.कोरेगाव.ता.बार्शी), परशुराम हरिश्चंद्र ढाकणे (वय २१,रा.कोरेगाव.ता.बार्शी), अमोल शंकर खताळ (वय २५,रा.मोरेवस्ती.ता.जामखेड), उमेश दगडू देवकते (रा.करमाळा रोड, कुर्डवाडी.ता.माढा) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी तपास केला असता, नळदुर्ग व उस्मानाबाद हद्दीत आरोपीनी ट्रक चालकांना मारहाण करुन त्यांच्याकडील पैसे जबरदस्तीने काढून घेत होते. उस्मानाबाद पोलीसांनी आरोपींनी अटक केली होती. तालुका पोलिसांनी उस्मानाबाद पोलिसांशी संपर्क करुन आरोपीना ताब्यात घेवुन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच नळदुर्ग पोलीस ठाणे, उस्मानाबाद पोलीस ठाणे व सोलापूर तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आरोपीनी एकाच दिवशी तीन दरोडे टाकले होते. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून इतर काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.पोलीस अधिक्षक विरेश प्रभु , अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे तपास करत आहेत.
महामार्गावर वाहनधारकांना लुटणाºया सात दरोडेखोरांना सोलापूर पोलीसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 4:25 PM
सोलापूर : सोलापूर हैद्राबाद महामार्गावर ट्रक अडवुन पैसे लुटणाºया चार जिल्ह्यातील सात दरोडेखोरांना सोलापूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
ठळक मुद्देसोलापूर तालुका पोलिसांनी केली अटक